मा.अमोलराजे भोसले यांचा वाढदिवस कोणतेही डाम-डोल न करता अन्नछत्र मंडळात साधेपणाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सेवेकऱ्यांच्या मुलांना सायकल भेट
वाढदिवस विशेष

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वभस्त अमोलराजे भोसले यांचा वाढदिवस कोणतेही डाम-डोल न करता अन्नछत्र मंडळात साधेपणाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सेवेकऱ्यांच्या मुलांना सायकल भेट देण्यात आले.*


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वछस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे उत्तम रित्या सुरु आहे. या अन्नदान सेवेचा लाभ देश परदेशातून येणारे स्वामी भक्त नित्य घेत आहेत.


गुरूपौर्णीमेला महारक्तदान शिबीरच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत केली जात आहे. याबरोबरच अमोलराजे भोसले यांच्या बरोबर हजारो युवावर्ग एकञीत येऊन श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जुना राजवाडा परिसरात शिवजन्मोत्सोव सोहळा थाटात साजरा केला जातो.

कोरोना काळात गरजूंना घरपोच जेवण, धान्य कीट व तालुक्यात विविध ठिकाणी कोरोना काळात केलेकी औषध फवारणी, तसेच न्यासकडून अक्कलकोट वासीयांना गरजू रुग्णांना रूग्णवाहीका आणि अग्निशामक गाडीची सोय करून देण्यात आली आहे. असे कित्येक सामाजिक उपक्रम मंडळाकडून राबविण्यात येत आहेत.
याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील व नजीकच्या कर्नाटक राज्यातील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, डॉक्टर, वकील व पत्रकार, उद्योग, सहकार क्षेत्रातील मान्यवर व मित्र मंडळ, न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी यांच्याकडून अमोलराजे भोसले यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी अमोलराजे भोसले मित्र परिवार व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी व कर्मचारी आदिजन उपस्थित होते.
*⭕चौकट :*
*भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा….*
अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वरस्त अमोलराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.