गावगाथा
राम गल्लीतील त्रिमूर्ती गणेश उत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन स्वामी यांची एकमताने निवड
निवड नियुक्ती

राम गल्लीतील त्रिमूर्ती गणेश उत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन स्वामी यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकतीच मंडळाची बैठक संपन्न झाली. यामध्ये नूतन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.*
मंडळाचे उपाध्यक्ष सोमशंकर मलंग, खजिनदार रोहीत सुतार व विजय स्वामी, कार्याध्यक्ष महेश भोसले व कैलास मलगोंडा तर सचिवपदी विनायक भोसले व विनायक सुतार या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात अली. त्रिमूर्ती गणेश उत्सव तरुण मंडळाचे वैशिष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून श्रींच्या विसर्जनाच्या दिवशी करण्यात येणारे आरास हे लक्षवेधी असते. अनेक वेळा या मंडळाने विसर्जन आरास स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे.
