मैत्री आणि श्रीमंतीमध्ये फरक काय? लहानपणीच्या मैत्रीबद्दल सयाजी शिंदे यांच्याकडू भावना व्यक्त
: ‘माणूस श्रीमंत नसतो माणसाच्या डोक्यात हवा असते. श्रीमंत म्हणजे काय?’, समाजातील वास्तव सांगत लहानपणीच्या मैत्रीबद्दल सयाजी शिंदे यांच्याकडून भावना व्यक्त
फक्त मराठी नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, असे दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे गेल्या काही दिवसांपासून लहानपणीच्या मैत्रीमुळे चर्चेत आहेत. अक्षेत्रात आपले करियर घडवून अभिनेते सयाजी शिंदे जरी एका मोठ्या शिखरावर पोचले असले तरी त्यांनी आपली लहानपणीची शिवबाची मैत्री अजूनही कायम ठेवली आहे… ज्या ज्या वेळेस सयाजी शिंदे साताऱ्यात येतात त्यावेळेस ही जोडी एकत्र पाहायला सध्या सयाजी शिंदे यांच्या यूट्यूब चैनल वर शिवज्या आणि आणि सयज्या या दोघांच्या नावाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. नुकताच झालेल्या मुलाखतीत त्यांनी मैत्री आणि श्रीमंतीमध्ये काय फरक आहे… हे सांगितलं आहे.
सयाजी शिंदे म्हणाले, ‘संपूर्ण समाजाचा मला दोष काय वाटतो, कोणतरी पैसे कमवायला लागला म्हणजे मोठा झाला. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. माणूस श्रीमंत नसतो माणसाच्या डोक्यात हवा असते. श्रीमंत म्हणजे काय? तो काय सोनं खाऊन जगतो नाही ना, अन्न खाऊन जगतो, ऑक्सिजन घेऊन जगतो. मग शिवबा लहान गरीब… याचा काय संबंध आहे? तो पण श्रीमंत आहे मी देखील श्रीमंत आहे. श्रीमंती व्याख्या जी आहे ती मोठी आपल्या समाजातील अडचण आहे. आम्ही दोघे लहानपणी जसे होतो तसेच आता देखील आहोत. गाडीचं काय आहे, आता पळायला लावलं तर, माझ्यापेक्षा जास्त तो पळेल. मग चांगला कोण?
गरिबीवर देखील सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं…
सयाजी शिंदे म्हणाले, ‘गरिबी म्हणजे, ज्याच्याकडे काहीच नाही. अन्न – पाणी मिळत नसलं. घालायला कपडे नाहीत त्याला गरिबी म्हणतात. पण खाऊन – पिऊन सुखी असणाऱ्यांना श्रीमंतच म्हणणार… चार गाड्या, घरं असणं हा रोग आहे. म्हणजे एका गाडीची गरज असताना तुमच्याकडे चार गाड्या आहेत. एका गाडीची गरज असताना तुमच्याकडे दहा घरं आहेत. म्हणजे तुम्ही रोगी माणसं अहात आणि अशा रोगी माणसांची आपल्या देशात, जगात संख्या जास्त आहे.
पुढे सयाजी शिंदे म्हणाले. ‘आमची जगण्याची भूमिका वेगळी आहे. जन्माला आलोय म्हणून आनंदात राहायचं. सर्वांना आनंदात ठेवायचं. पण त्याआधी आपण आनंदी असायला हवं… सुखी आणि समाधानी राहायचं आहे.’
गाव म्हणजे कुटुंब – सयाजी शिंदे
‘गाव म्हणजे कुटुंब… आम्ही शाळेत एकत्र जायचो. व्यायाम करायला देखील शिवबाने मला शिकवलं आहे. पण मला आता कळलं की, तो माझ्यापेक्षा मोठा आहे. कारण तो पहिलीत माझ्यासोबत आला होता. सुरुवताीचे दोन चार वर्ष तो शाळेतच गेला नव्हता. त्यामुळे माझ्यापेक्षा चार वर्ष मोठा होता. आमचा हिरो होता शिवबा… आमच्या गावात सातवी पर्यंत शाळा. त्यामुळे नंतर वेगळे झालो.’ एवढंच नाही तर, शिवबा आणि सयाजी शिंदे यांनी गावात होणाऱ्या नाटकात देखील एकत्र काम केलं आहे. दिग्दर्शकाची भूमिका शिवबा सांभाळायचा… असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!