मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत कल्याणशेट्टी विद्यालयाचे यश..
अक्कलकोट:
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयास तालुक्यात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल अक्कलकोट तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी व सहकारी ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत रूगे, रविकिरण दंतकाळे, कल्पना स्वामी, निशिगंधा कोळी याना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी, उपस्थित होते.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाने सन २०२४‐२५ या वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभाग नोंदवला होता. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व बाबी पूर्ण करून ही शाळा विहित निकषात उतरले होते. त्यामुळे शिक्षण विभागातील तज्ञ पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून मूल्यमापन केले होते. शाळेतील तंत्रशिक्षक व इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभल्यामुळेच हे यश मिळाल्याचे मुख्याध्यापक भरमशेट्टी यांनी यावेळी सांगितले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बोलताना काळानुसार शिक्षकांनी सुद्धा बदल स्वीकारले पाहिजे. सध्या शिक्षणात खुप स्पर्धा आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका खुप महत्त्वाची आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षकांनी अध्यापनात बदल केले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात शाळेला यश मिळाल्याबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी,संचालक मल्लिकार्जुन मसुती, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!