गावगाथा

महाराष्ट्र ही संतांची भूमी अन संस्कारांची जननी — मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे

एकादशी विशेष

महाराष्ट्र ही संतांची भूमी अन संस्कारांची जननी — मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) आषाढी वारीची ओढ पायी पंढरपूरला जाणारे असंख्य भाविक .माऊलीचा जयघोषात अवघा महाराष्ट्र तल्लीन झाला आहे .प्रत्येकाच्या ठायी विठ्ठल नामाचा जप असताना जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरी येथील विद्यार्थ्यानी हातात टाळ कपाळी बुक्का डोक्यावर तुळस घेऊन माऊली माऊली विठ्ठल नामाची शाळा भरली अशी गाणी व गाण्यावर ठेका धरून गावातून आषाढी दिंडी काढली .विद्यार्थी हातात फलक घेऊन जनजागृतीचा संदेश देत होती .आपली मुले शाळेत पाठवा झाडे लावा आणि I’ve प्लास्टिक मुक्त गाव करा विठ्ठलवारी संस्कार घरोघरी अश्या अनेक फलकांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला .सर्व विद्यार्थ्याची वारकऱ्यांची वेशभूषा हे आकर्षणाचे केंद्र होते .छोटे छोटे वारकरी गावातून जात असताना आपापल्या मोबाईल मध्ये बाळगोपाळाची क्षणचित्रे टिपत होती .कौतुकाने दाद देत होती .परमेश्वर मंदिरात बालवारकरी गेले देवाचे दर्शन घेतले गोल रिंगण करून विविध खेळ खेळले .फुगडी कान धरून देवाची क्षमा मागणे भजन गाणी तालावर ठेका इत्यादी खेळातून पंढरपूरला जाणारी आषाढी वारीचे प्रतिरूप व आपल्या संतांच्या संस्कारांची ओळख व्हावी यासाठी अश्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सर्व शिक्षकांनी केले .आपला भारत देश संस्कृती महान आहे .महाराष्ट्रात थोर संत होऊन गेले त्यांनी जगाला फार मोठे संदेश देऊन गेले त्याची जोपासना आणि संस्कार ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे .त्याचे जतन करणे कर्तव्य आहे .महान संस्कृतीचा वारसा घेऊन आपण जन्माला आलोय हे भाग्य आहे .महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि संस्काराची जननी आहे असे मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी बाळगोळ्यांच्या आषाढी वारीतील आकर्षक वारकऱ्यांना मार्गदर्शन करत होत्या .पंढरपूरला पायी जाणाऱ्या विठ्ठला ची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची देवाबद्दल असलेली अमाप भक्ती श्रद्धा दिसून येते .जवळजवळ 21 दिवस पायी चालत भक्तिभावें ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता सगळे संस्कार संस्कृती जपत आपल्या संतांच्या पालख्या घेऊन पायी पंढरीच्या दर्शनाला जातात .अनेक भागातून अनेक लोकं एकत्रित येतात प्रत्येकाच्या मुखी एकच नाव असत आपल्या विठूरायाच .ते सगळे भाव ती श्रद्धा आपल्या मनामध्ये रुजायला हवी बालमनावर संतांच्या कामगिरीची माहिती व्ह्यायला हवी त्यापुढे नतमस्तक व्ह्यायला हवे .आजच्या आषाढी वारीचा उद्देश असाच मनात जपून आषाढी वारी काढुन आपण मंत्रमुग्ध झालो आहोत .बालवारकरी तल्लीन होऊन शैक्षणिक वारी काढली हा मनाला भावणारा व कौतुकाचा विषय ठरला .पालकांचे विशेष आभार की त्यांनी विठ्ठल रुक्मिणी च्या व वारकऱ्यांच्या वेशभूषेत आपल्या लेकरांना शाळेत पाठवले . बाबासाहेब बनसोडे तोलन बागवान अर्चना गिरी मनिषा कुणाळे रेखा सोनकवडे यांनी दिंडीचे आयोजन करून आषाढी शाळेची दिंडी यशस्वी केली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button