*श्री रामलिंगेश्वर शिक्षण संस्थेस सीपीटीपी प्रशिक्षणार्थी वर्ग १ अधिकाऱ्यांची भेट*
——————————————————-
श्रीक्षेत्र तीर्थ (ता. द. सोलापूर )श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात यशदा येथील सीपीटीपी १० अंतर्गत प्रशिक्षण घेणारे वर्ग एकचे अधिकारी मा.महेश येलगटे (उपजिल्हाधिकारी),मा.गणेश शिंदे(पोलीस उपअधिक्षक) मा.रोहन जाधव( जिल्हा कोषागार अ धिकारी) मा.प्रमोद खमाट(तहसिलदार) मा. लक्ष्मण हगवणे(महिला व बाल विकास अधिकारी)यांनी भेट देऊन शालेय कामकाज, शाळेतील विविध उपक्रम, शालेय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी अशा अन्य विषयावर सविस्तर चर्चा करून माहिती उपलब्ध करून घेतली. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधले.शाळेच्या निसर्गरम्य वातावरणाची प्रशंसा करून ग्रामीण भागामध्ये संस्थेचे अध्यक्ष शिक्षण प्रेमी प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी निर्माण केलेले शिक्षण संकुल समाजाला योग्य मार्ग दाखवेल असा विश्वास व्यक्त करून समाधान व्यक्त केले.शाळेमध्ये दिले जाणारे शिक्षण व संस्थेने पुरवलेल्या शालेय साहित्य व भौतिक सुविधा बाबत समाधान व्यक्त केले.यावेळी रोहन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या निरीक्षणास आलेल्या विद्यार्थी गुणवत्ता व भौतिक सुविधा याबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी इयत्ता आठवी पासूनच तयारीला लागावे असे आवाहन केले. यावेळी सर्व अधिकारी वर्गांचा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी तीर्थ गावचे उप सरपंच पैगंबर मुल्ला ग्रामविकास अधिकारी रशीद तांबोळी, रोजगार सेवक विठ्ठल पाटील, कर्मचारी श्रीकांत चितले, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर सोनकवडे तर सूत्रसंचालन व आभार महेश पट्टणशेट्टी यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!