🌟 कर्मयोगींचा गौरव! मा. नृसिंह मुळे यांना ‘कर्मजित पुरस्कार’ने सन्मान 🌟
HTML img Tag
पुणे : भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आधुनिकतेकडे झेप घेत असलेल्या ‘नृत्यकला संगम – २०२५’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन आशुतोष डान्स स्टुडिओज् आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

HTML img Tag
या रंगतदार कार्यक्रमात “संस्कार, संस्कृती, सन्मान !” या तत्त्ववाक्याच्या अधिष्ठानावर समाजकार्य, कला आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मा. नृसिंह मुळे यांना “कर्मजित पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन
मा. श्री. मेघराजजी राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नाट्यपरिषद, पुणे शाखा) यांच्या हस्ते झाले.
सन्मानिय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते:
▪ श्री. सुनिलजी गोडबोले – सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते
▪ मा. श्री. सुरेशजी खोपडे – राष्ट्रपती शौर्य पदक विजेते, (आय.पी.एस. नि.)
▪ मा. डॉ. अशोकजी नगरकर सर – (वरिष्ठ शास्त्रज्ञ (रि.), जॉइंट डायरेक्टर, डीआरडीओ, भारत सरकार)
▪ श्री. शहाजीरावजी पाटील – (डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस (नि.), अभिनेते, निर्माते)
▪ श्री. राहुलजी पोकळे – अध्यक्ष, राष्ट्रसेवा समूह, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस
▪ मा. गो. छबूताई वैरागडे मॅडम – माजी नगरसेविका, चंद्रपूर
▪ मा. सौ. संजीवनीताई बालगुडे मॅडम – अध्यक्षा, प्रियंका महिला उद्योग संस्था
▪ RJ. सुमित – सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी व अभिनेता
▪ श्री. पियुष गजधने – युवा उद्योजक, प्रेरणादायी वक्ते
▪ श्री. वैभव ढुस – युवा नेतृत्व
▪ अनिकेतजी काकासाहेब चव्हाण – संचालक, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान
▪ मा. सी. विजया मानमोडे मॅडम
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनानेही सर्वांची मने जिंकली.
🎙️ श्री. संदीपजी पाटील सर – सेलिब्रिटी अँकर, गायक, अभिनेता
🎙️ श्री. बाळकृष्णजी नेहरकर सर – सुप्रसिद्ध निवेदक व खेळांचे जाणते अभ्यासक
या सोहळ्यात नृत्यकलेचा बहारदार नजराणा, लोककला, गौरव सन्मान अशा विविधतेने सजलेला कार्यक्रम पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
नृसिंह मुळे यांना मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा समाजप्रती असलेल्या निष्ठेचा आणि प्रामाणिक योगदानाचा गौरव असून, हा पुरस्कार नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
📸 फोटो क्रेडिट : आनंद देवळे