गावगाथा

स्वामीकृपेचा ध्यास घेवून वटवृक्ष मंदीरात आलोय – ह.भ.प.इंदूरीकर महाराज

ह.भ.प.इंदूरीकर महाराज यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामीकृपेचा ध्यास घेवून वटवृक्ष मंदीरात आलोय – ह.भ.प.इंदूरीकर महाराज
(श्रीशैल गवंडी,सोलापूर, )
जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि हरि दर्शनाची अनुभूती प्राप्त होते असे साक्षात्कारिक स्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे पावन स्थान तथा येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. केवळ भाग्यवंतांनाच स्वामी कृपेचा लाभ मिळतो याची प्रचिती स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेल्या भाग्यवान स्वामी भक्तांनाच येते. या अनुशंगाने स्वामीकृपेचा ध्यास घेवून आज येथील श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आलो असल्याचे भावोद्गार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराष्ट्र भुषण गुरुवर्य ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी काढले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास स्वामी कृपेच्या ध्यासाने भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी स्वामी कृपेच्या ध्यासाप्रित्यर्थ बोलताना ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर
यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वात सर्व स्तरातील भक्तांना समान न्याय देवून सेवेची संधी दिल्याने व मंदीर समितीच्या कुशल धार्मिक कार्यामुळे स्वामीनामाचा प्रचार व प्रसार जगभर होत असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, योगेश धर्माधिकारी, विलास कलकर्णी,
संजय पवर, गिरीश पवार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, संजय पाटील, देवस्थानचे सेवेकरी उपस्थित होते.
फोटो ओळ – ह.भ.प.इंदूरीकर महाराज यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button