परमार्थाची प्रचिती संतांच्या सहवासातच येते – ह.भ.प.विजय महाराज पांचाळ
अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित विठ्ठल मंदीरात आषाढी एकादशी निमीत्त आयोजीत कीर्तन सेवेत ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांचे निरूपण.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०६/०७/२०२५) – मनुष्य जीवन हे संत सहवासातच पुर्णत्वास जाते. भौतिक सुखाने मनुष्य कितीही समृध्द असला तरी जीवनाची पुर्णता ही समाधाना तच आहे. संताच्या या शिकवणीनुसारच आजपर्यत पिढ्या घडल्या आहेत, म्हणून अबालवृध्दांसह तमाम नागरिकांनी संतांचे परमार्थिक शिकवण आत्मसात करावे, कारण परमार्थाची प्रचिती संतांच्या सहवासातच येते असे निरुपण श्रीक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांनी केले. ते आषाढी एकादशी निमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती संचलित ए.वन चौक, उपलप विठ्ठल मंदिर येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळयात निरुपण करताना बोलत होते. कीर्तन सेवेच्या प्रारंभी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व उपलप विठ्ठल मंदीर समितीच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी उपस्थित भजनी मंडळ, आरती उपलप, जयेश उपलप तथा ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांचा श्री.स्वामी समर्थाचे व श्रीहरी विठ्ठलाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. कीर्तन सेवेतून पुढे निरुपण करताना ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांनी परमार्थ म्हणजे आपल्या जीवनातून नको ते घालवणे होय. कशाचीही वासना मनात ठेवून परमार्थ करु नये. अगदी मोक्षाचीही वासना नको. मोक्षाऐवजी साधनेची काळजी घ्यावी. जीवनाच्या वाटेवरुन चालताना आपल्या हातून घडणारे पाप पुण्य भगवंतास अर्पण करुन मोकळे व्हायचे अशाप्रकारे जीवन पाप पुण्य रहित बनवायचे मगच भगवंताची भेट होते. मनात कोणतीही अपेक्षा व इच्छा न ठेवता केवळ भगवंताच्या भेटीच्या आतुरतेने पंढरीच्या वाटेने निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात प्रत्येक क्षणाला आणि पावलाला परमार्थाची प्रचिती येते. ही प्रचिती अनुभवण्यासाठी त्या संतांच्या सहवासातच वाटचाल करावी लागते असेही निरुपण ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांनी कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात केले. या कीर्तन सेवेत त्यांना हार्मोनियमवर चैतन्य पांचाळ, व मृदंगावर कैवल्य पांचाळ यांनी उत्तम साथसंगत केली.
यावेळी मराठवाड्यातील चिकुर्डा, तावशी, व मुस्ती येथून आलेल्या भजनी मंडळांनी श्री चरणी भजनसेवा अर्पण केली.
तत्पूर्वी पहाटे ५ वाजता विठ्ठलाची महापूजा मुख्य पुरोहित दीपक व राघवेंद्र बागेवाडीकर यांच्या मंत्रोपचारात व देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, आरती उपलप व परिवार यांच्या उपस्थितीत झाली.
यानंतर उपस्थित सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाचे फराळ प्रसाद, चहा, कॉफी प्रसाद देण्यात आले. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मनोहर देगांवकर व सहकारी यांच्या सुश्राव्य गायन सेवेने विठ्ठल मंदीर परिसर भक्ती निनादाने दुमदुमला.
याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीमुख जगदाळे, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, प्रा.शिवशरण अचलेर, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार,
रवीराव महिंद्रकर, महेश देसाई, काशिनाथ इंडे, श्रीशैल गवंडी, सागर मोरे, संजय मोरे, स्वाती गाडे, सोनाली चव्हाण, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे, जयश्री माने यांसह असंख्य भाविक उपस्थित होते.
फोटो ओळ – कीर्तनसेवा सादर करताना ह.भ.प. विजय महाराज पांचाळ व सहकारी दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!