गावगाथा
ग्रामीण संलग्नता अभ्यास दौऱ्यातून स्वच्छतेचा संदेश; सोलापूर जिल्ह्यात वळसंग येथे यशस्वी स्वच्छता दिंडी
स्वच्छता दिंडी


ग्रामीण संलग्नता अभ्यास दौऱ्यातून स्वच्छतेचा संदेश; सोलापूर जिल्ह्यात वळसंग येथे यशस्वी स्वच्छता दिंडी

सोलापूर : यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे यांच्या ग्रामीण संलग्नता अभ्यास दौऱ्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात विविध गावांमध्ये सहा ते सात प्रशिक्षणार्थी अधिकारी निवासी प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणाच्या भाग म्हणून स्वच्छता जनजागृतीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणार्थी अधिकारी उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते, सुनिल टाकळे, प्रकल्प अधिकारी राहुल शिर्के, सहाय्यक राज्यकर आयुक्त अक्षता कुपटे व सचिन जाधव, पोलीस उपअधीक्षक रोहित कलमदाने, महिला व बालकल्याण अधिकारी सागर कोल्हे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमास सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजकुमार जाधव, शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य विरेश थळंगे, महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
