

वळसंग येथे यशदा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांकडून वृक्षारोपण

वळसंग (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे यांच्या ग्रामीण संलग्नता अभ्यास दौऱ्याच्या अंतर्गत वळसंग येथील स्वामी समर्थ विश्रामधाम परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.


या उपक्रमात उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते, सुनिल टाकळे, प्रकल्प अधिकारी राहुल शिर्के, सहाय्यक राज्यकर आयुक्त अक्षता कुपटे व सचिन जाधव, पोलीस उपअधीक्षक रोहित कलमदाने, महिला व बालकल्याण अधिकारी सागर कोल्हे व इतर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत वृक्षारोपण केले.

कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी राजकुमार जाधव, इरण्णा मिसे, पार्श्वनाथ खोबरे, कुमार होटकर, बप्पी कांबळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी यशदा चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, दक्षिण गोव्याचे आमदार विजय पैकखोत, माजी मुख्याध्यापक सिद्धारूढ काळे सर, पत्रकार दिनकर नारायणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.