अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध – आ. जयंत आसगावकर.
पुणे विभाग मुख्याध्यापक संघांचे सचिव श्रवण बिराजदार, शहाजी ठोंबरे, अभिजित पाटील, लक्ष्मण चलगेरी, अण्णासाहेब गायकवाड, कृष्णदेव बेहरे, रामचंद्र जानकर, वैभव पाटील, प्रा. मनोज जगताप, तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले. आभार संतोष जाधव यांनी मानले.

अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध – आ. जयंत आसगावकर.

अक्कलकोट – (प्रतिनिधी)

महाराष्ट्रासह सीमावर्ती भागातील अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून पुणे विभागाचा शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणुन हे सर्व प्रश्न येणाऱ्या वर्षभरात सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांचे आ. जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले. अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फत्तेसिंह चे अध्यक्ष राजीव माने हे होते. यावेळी मंचावर उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, विश्वस्त बाळासाहेब मोरे, संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव-फुटाणे, विश्वस्त सुधाकर गोंडाळ उपस्थित होते.

प्रारंभी उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी प्रास्तविकातुन मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी पुढे बोलताना आ. आसगावकर म्हणाले, मी निस्सीम स्वामीभक्त असून 1990 पासून स्वामींच्या दर्शनाला येत असतो. स्वामींच्या आशिर्वादामुळे आमदार झालो. या तालुक्यातील शिक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले. त्यातून उतराई होणे अशक्य असले तरी प्रत्येक शिक्षक सुखाने आणि आनंदाने जीवन जगला पाहिजे यासाठी माझ्या आमदारकीचा पुरेपूर वापर करेन. सर्व शिक्षकांनी आपले प्रश्न थेट माझ्याशी संपर्क करून मांडावेत. आपल्या सेवेसाठी मी तत्पर आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष राजीव माने म्हणाले, तालुक्यातील सर्वात जुनी शिक्षण संस्था असलेल्या फत्तेसिंह संस्थेच्या विकासासाठी आ. आसगावकर यांचे नेहमीच योगदान असते. यापुढेही त्यांचे सहकार्य मिळत राहील.

यावेळी पुणे विभाग मुख्याध्यापक संघांचे सचिव श्रवण बिराजदार, शहाजी ठोंबरे, अभिजित पाटील, लक्ष्मण चलगेरी, अण्णासाहेब गायकवाड, कृष्णदेव बेहरे, रामचंद्र जानकर, वैभव पाटील, प्रा. मनोज जगताप, तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले. आभार संतोष जाधव यांनी मानले.

चौकट –
या कार्यक्रमात बोलताना आ. आसगावकर यांनी फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या विस्तार व वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत संस्थाध्यक्ष राजीव माने आणि विश्वस्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव फुटाणे यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.