श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळात दही हंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न…
दहीहंडी उत्सव विशेष

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळात दही हंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळात दही हंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला.*
दरम्यान मंडळाच्या महाप्रसादालयात गोकुळ अष्टमी निमित्य पाळणा व गुलाल व आरती आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पाळण्यास विविध फुलाने सजविण्यात आलेले होते.

शहरातील दही हंडी फोडण्याचा मान संस्थानकालीन, श्रीमंत विजयसिंहराजे भोसले चौकातील वडार समाजातील युवकांना असून, सदरजणांनी प्रमुख मार्गावरून ढोल ताश्याच्या गजरात युवक मिरवणूकीने अन्नछत्र मंडळात येऊन क्रेनच्या सहाय्याने उभारण्यात आलेली दही हंडी फोडण्यात आली.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, मल्लिकार्जुन बिराजदार, शहाजीबापू यादव, निखील पाटील, गोटू माने, अतिश पवार, प्रवीण घाडगे, पिट्टू साठे, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराव होटकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
