गळोरगीत रक्तदानाने मोहरम व आषाढी एकादशी एकत्रित उत्साहाने साजरी.
(एकुण ४७ जणांचे रक्तदान उडगी केंद्र दहावी यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थांचा देखील सत्कार

अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथे सामाजिक बांधिलकी जपत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम व लाखो वारकर्यांचा भक्तीचा वारसा असलेली आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने रक्तदानाचा अभिनव उपक्रम राबवत व पारीतोषिक वितरण करत साजरी करण्यात आली .श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच व गळोरगी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकुण ४७ जणांनी रक्तदान केले.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन शेतकरी नेते तथा ठाकरे गटाचे शिवसेना अक्कलकोट तालुका प्रमुख श्री आनंद बुक्कानुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थांनी शिवसेना तालुका अध्यक्ष श्री राम जाधव व शिवसेना अल्पसंख्याक गट अध्यक्ष श्री पठान हे होते. मकर संक्रांत, गुढीपाडवा व मोहरमनिमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच व गळोरगी ग्रामस्थांमार्फत मागील तब्बल २५ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदाचे रक्तदानाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते.यावेळी श्री समर्थ कॅाम्प्युटर्स सोलापूर यांच्या वतीने उडगी केंद्र दहावी उत्तीर्ण यशस्वी दहा विद्यार्थांचा प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या शिबिरासाठी मा तंटामुक्त अध्यक्ष श्री आप्पाराव बिराजदार,श्री नागण्णा जकापुरे,श्री शरणप्पा कौटगी (सर) , माजी सोसायटी चेअरमन श्री भिमाशंकर आजुरे, माजी सैनिक श्री बसवराज पाटील, पोलीस पाटील श्री सुरेश मैंदर्गी, श्री अकबर नदाफ (सर) ,सरपंच प्रतिनिधी श्री रेवणसिध्द कौटगी (सर), श्री हणमंत मणुरे,कॅांग्रेस अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील, ठाकरे गट गळोरगी ग्राम अध्यक्ष श्री राजशेखर अंदोडगी,वे राहुल स्वामी,माजी सरपंच श्री मच्छिद्र बनसोडे , श्री राजेभाई नदाफ ,युवा नेते श्री रमेश आळगी ,श्री विठ्ठल सुतार,श्री संतोष जमादार , गौरी टुर्स ट्रॅव्हल्स पुणेचे श्री चेतन निरोणे आदी उपस्थित होते.आषाढी एकादशी निमित्त युवा मंच तर्फ फळांचे वाटप देखील करण्यात आले.

प्रास्ताविक व कार्यक्रम सूत्रसंचालन युवा मंच अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सिकंदर जमादार यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री चंद्रकांत निरोणे, श्री प्रकाश मैंदर्गी ,श्री शिवानंद बिराजदार (सर) ,वे ईरय्या स्वामी, श्री केदारनाथ अंदोडगी, श्री सिध्दाराम बिराजदार, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री चंद्रकांत माशाळे,युवा नेते श्री विशाल बिराजदार, इंजिनियर श्री किरण पाटील ,श्री सोमनाथ बिराजदार , श्रीशैल पाटील,श्री अर्जुन बडदाळे, श्री कबीर नदाफ , सौ निलोफर नदाफ , श्री प्रेम जकापुरे, श्री संतोष बणजगोळ,श्री संजय आळगी , श्री ईरफान नदाफ,श्री गुरु अंदोडगी,श्री राजेभाई शेख, श्री विठ्ठल अंदोडगी,श्रीशैल पुजारी, श्री अजय बिराजदार,श्री अस्लम नदाफ , श्री समर्थ बिराजदार,श्री भिमाशंकर कासेगावकर, श्री गौरीशंकर पुजारी,श्री चन्नप्पा माशाळे,श्री विवेक गौडगाव,श्री दमणू जमादार, श्री राचप्पा बिराजदार,श्री प्रभुलिंग बिराजदार,श्री अनमोल कुंभार, श्री यल्लप्पा मैंदर्गीकर , श्री राजू कोळी , श्री प्रशांत नोने,श्री ईब्राहीम नदाफ,श्री मल्लिनाथ आळगी, श्री अविनाश बिराजदार,श्री संजय आळगी,श्री बसवराज पुजारी, श्री सिद्राम पुजारी , श्री उमेश बंजलगी व गळोरगी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.रक्त संकलनासाठी श्री शिवशंभो बल्ड बॅंक व श्री स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर अक्कलकोट यांचे सहकार्य लाभले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!