ग्रामीण कला

विराटपूर विरागी’ चित्रपटाच्या प्रचारार्थ,अक्कलकोट तालुक्यात ठिकाणी विविध भव्य रथयात्रा व उद्बोधन सभा.

बहुचर्चित हानगलश्री कुमार शिवयोगी यांच्या जीवनपटावर आधारित 'विराटपूर विरागी'

विराटपूर विरागी’ चित्रपटाच्या प्रचारार्थ,अक्कलकोट तालुक्यात ठिकाणी विविध भव्य रथयात्रा व उद्बोधन सभा.

HTML img Tag Simply Easy Learning    

बहुचर्चित हानगलश्री कुमार शिवयोगी यांच्या जीवनपटावर आधारित ‘विराटपूर विरागी’
या कन्नड चित्रपटाच्या प्रचारार्थ,मंगळवार दि.20.12.2022 रोजी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच वेळी,सहा रथयात्रा निघणार असून दि.01.01.2023 रोजी गदग (कर्नाटक) येथे सांगता होणार आहे.
सतत 13 दिवस चालणाऱ्या या रथयात्रेचे,7000 कि.मी.चे अंतर ,360 उद्बोधन सभा,अंदाजे 1 कोटीहून अधिक लोकांची व्याप्ती ही ठळक वैशिष्टये असणार आहेत.त्यामुळे ही रथयात्रा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.
नियोजित ‘सोलापूर -गदग रथयात्रा’ मंगळवार, दि. 20.12.2022 रोजी अक्कलकोट येथे पोहोचणार आहे.त्यानिमित वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथून सांय.5:30 वा. मेनरोड मार्गे भव्य शोभायात्रा निघणार असून याची सांगता ग्रामदैवत श्रीमल्लिकार्जून मंदिर येथे सांय6:30वा.उद्बोधन सभेने होणार आहे.
ही उद्बोधन सभा श्री.म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी वीरक्तमठ, अक्कलकोट यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील उपस्थित सर्व पूज्यश्रींच्या दिव्य सानिध्यात व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
हा चित्रपट, परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रेरणेतून, ‘गुरुदेव सेवा संस्था’ संचलित ‘समाधान’ केंद्राची निर्मिती आहे. या चित्रपटाचे निर्देशन राष्ट्रीय पुरस्कार विजेते ख्यातनाम दिग्दर्शक श्री. बी.एस्. लिंगदेवरु यांनी केलेली आहे.
चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट मनोरंजनासाठी नसून, विराटपूर विरागी हानगलश्री कुमार शिवयोगी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजासाठी समता, सर्वसमावेशित शिक्षण, अंध अपंगांसाठी संगीत शिक्षण, व्यवसाय शिक्षणातून महिला सबलीकरण, न्याय्य हक्कासाठी अखिल भारतीय वीरशैव महासभेची स्थापना, सुसंस्कृत समाजबांधणीसाठी शिवयोग मंदिराची स्थापना, वचन साहित्य संग्रहालय, ग्रंथालयाची स्थापना , गौशाला, गौमय विभूती व इस्टलिंग निर्मिती, सूतगिरणीची उभारणी, आयुर्वेद चिकित्सालय, चित्रमंदीर, प्राणीबलीचा निषेध अशी अपार कष्ट घेऊन अपुऱ्या साधनसामग्रीसह केलेले महान सामाजिक व धार्मिक कार्य प्रकाशझोतास आणणे व त्यातून समाजप्रबोधन करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा चित्रपट भावी पिढीसाठी निश्चितच पथदर्शक दीपस्तंभ ठरणार आहे.
अक्कलकोट शहर व परिसरातील बंधु-भगिनींनी सदरच्या उपक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहून या सामाजिक कार्यात आपलेही योगदान देऊन उपकृत व्हावे असे नम्र आवाहन समाधान मेळा, अक्कलकोट यांचे वतीने करण्यात येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button