सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा व माजी विद्यार्थ्यांचे स्नेह-मेळावा!*
सन १९९८-९९ च्या इ-१० वर्गमित्र-मैत्रिणीची पुन्हा भरली शाळा.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221219_113549-780x470.jpg)
सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा व माजी विद्यार्थ्यांचे स्नेह-मेळावा!
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
चपळगाव येथे ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सन १९९८-९९ च्या इ-१० वर्गमित्र-मैत्रिणीकडून सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा व तसेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेह-मेळावामोठ्या उत्साहात संपन्न झाला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पुष्पवृष्टीमध्ये स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात स्व.इनायतअली पटेल व स्व.पी.वाय.पाटील सर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोएब पटेल यांनी केले.
यानंतर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे फळे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. पटेल सरांनी आपल्या मनोगतात या सत्कार सोहळ्याने आम्ही सर्वजण भारावलो असे सांगितले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
माजी प्राचार्य श्री हिरेमठ सरांनी संस्थाअध्यक्ष मा.श्री. रविकांत पाटील यांनी या सत्कार सोहळ्यास व स्नेह मेळाव्याला शुभेच्छा दिले आहेत असे सांगितले.
माजी विद्यार्थी अभय अवताडे यांनी सांगितले की, या सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले व या शाळेने आम्हाला खूप काही दिले म्हणून आम्ही आज प्रगती करू शकलो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गोविंदे सरांनी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेला आजचा सन्मान व आदरभाव अविस्मरणीय आहे असे सांगितले.
यावेळी प्रशालेकडून माजी विद्यार्थी अभय अवताडे(आँस्ट्रेलिया),काशीनाथ गवी(कुवेत)व रतिश नारायणकर(मुंबई पोलीस) यांचे सत्कार श्री. मूली सर,श्री. माने सर,श्री. कत्ते सरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीसुद्धा यावेळी नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला.
स्नेह-मेळाव्यातील माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेतील विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणारे विद्यार्थ्यांना बक्षीस देणार असल्याचे सांगितले.
यानंतर स्नेहभोजन, माजी विद्यार्थ्यांनी खो-खो खेळ व
गप्पा-गोष्टी केले.
विशेषतः या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे स्नेह-भोजन व्यवस्था चपळगावातील भूमीपुत्र सामाजिक संघटनेकडून करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग, माजी विद्यार्थी शोएब पटेल, यशवंत दुलंगे, विनोद जाधव, अकबर कवठेकर,विठ्ठल सोनार,भाग्येश्वर भंगे, प्रशांत पोपसभट,मुलका नदाफ,संजय जाधव व सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. विजापूरे सर यांनी केले व प्राचार्य श्री मूली सरांनी सर्वांचे आभार मानले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)