गावगाथा
सदलापूर कन्नड शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत १००% निकाल – पाचही विद्यार्थी गुणवत्ता यादीत
शाळेच्या यशावर गावभर कौतुकाचा वर्षाव


सदलापूर कन्नड शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत १००% निकाल – पाचही विद्यार्थी गुणवत्ता यादीत
शाळेच्या यशावर गावभर कौतुकाचा वर्षाव
सदलापूर (ता. अक्कलकोट) – शैक्षणिक वर्ष 2024–25 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, सदलापूर या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील इयत्ता पाचवीतील पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे पाचही विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शाळेचा निकाल १००% लागल्यामुळे संपूर्ण केंद्रात आणि परिसरातील गावांमध्ये सदलापूर कन्नड शाळेचे नाव उजळले आहे.
या उल्लेखनीय यशामागे वागदरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बसवराज मुनोळी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक पोमाजी सर, म. अब्दुलनबी पाटील सर, वर्गशिक्षक धरेप्पा कटगेरी सर आणि सौ. सुदेवी भिमाशंकर किरनळी मॅडम यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनीही विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.
गुणवत्ताधारक विद्यार्थींची नावे पुढीलप्रमाणे:
-
कु. गौरी मल्लाप्पा लोहार
-
कु. काशिनाथ श्रीकांत गायकवाड
-
कु. सरस्वती शिवानंद गवळी
-
कु. रायप्पा गजानंद गवळी
-
कु. पृथ्वी बलवंत बजे