“एक हात मदतीचा” उपक्रमांतर्गत वागदरी येथे शेळके प्रशालेत वही वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
शालेय उपक्रम

“एक हात मदतीचा” उपक्रमांतर्गत वागदरी येथे शेळके प्रशालेत वही वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

वागदरी (ता. अक्कलकोट) | शनिवार, दि. १२ जुलै २०२५ — शिक्षक भारती संघटना सोलापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. सुजितकुमार काटमोरे सर, सचिव श्री. सुरेश कणमुसे सर व संघटनेच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम श्री एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी येथे संपन्न झाला. या उपक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल देशमुख सर, पर्यवेक्षिका सौ. शैलशिल्पा जाधव मॅडम व जेष्ठ शिक्षक श्री. मल्लया मठपती ,पंचप्पा सोनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. अनिल देशमुख सर यांनी शिक्षक भारती संघटनेचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

शिक्षक भारती संघटनेच्या सामाजिक जाणिवेचे व विद्यार्थ्यांविषयी असलेल्या कळकळीचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
