श्री वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर – मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील
(अक्कलकोट, दि.२३/०५/२०२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे.
येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा,
विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मिक पैलुंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वोच्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत राज्याचे मा.सहकार मंत्री
हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास पत्नी भाग्यश्री पाटील यांच्या समवेत सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी
मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पाटील यांचा सपत्निक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील
बोलत होते. याप्रसंगी त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील इंगळे कुटुंबीयांची पिढीजात स्वामी सेवा प्रथमेश इंगळे यांच्याकडून आस्थेने जाणून घेतली व या स्वामी सेवेने इंगळे कुटुंबीय धन्य असल्याचे सांगून पुन्हा पुन्हा स्वामिनी आपल्याला दर्शनास बोलवावे असे मनोगतही हर्षवर्धन पाटील याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, संतोष जमगे, महेश काटकर, श्रीकांत मलवे, विपुल जाधव आदीसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!