संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रम्हाची साक्ष देणारे स्वामींच्या दरबारातील अन्नछत्र असल्याचे मनोगत दैनिक संचार चे संपादक तथा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट,दि.२० – (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रम्हाची साक्ष देणारे स्वामींच्या दरबारातील अन्नछत्र असल्याचे मनोगत दैनिक संचार चे संपादक तथा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केले.
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास रविवारी सायंकाळी अन्नछत्र मंडळास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली असता त्याप्रसंगी अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संपादक काडादी बोलत होते. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच कमिटीचे सदस्य सिध्देश्वर बामणी, विश्वनाथ लब्बा, प्रकाश बिराजदार, रतन राईक, मंडळाचे सचिव श्याम मोरे आदी उपस्थित होते.
धर्मराज काडादी पुढे बोलताना म्हणाले, संपूर्ण देश विदेशात अन्नदान सेवेत नावलौकिक मिळविलेल्या या अन्नछत्र मंडळाकडून धार्मिक कार्याबरोबरच समाजसेवेला महत्व देऊन तमाम भाविकांच्या सेवेसाठी दिवस व रात्र कार्यरत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावात न्यास पोहचले असल्याचे सांगून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संपादक काडादीसह सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व अमोलराजे भोसले, मंडळाचे सचिव श्याम मोरे यांच्या समवेत मंडळाच्या महाप्रसाद गृह, किचन विभाग, नियोजित महाप्रसाद भवनाच्या परिसर, शिवसृष्टी, श्री आई तुळजाभवानी मंदिर, समर्थ वाटिका सह मंडळाच्या परिसरातील सोयी सुविधा ची पाहणी करून स्वच्छ, शांत सुंदरसह भक्तिमय वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ, सेवाभावी कार्यकर्ते यांच्या निष्काम सेवा कार्याबद्दल काडादीसह सहकारी विश्वस्त मंडळाने कौतुक केले. यावेळी अमोलराजे भोसले व श्याम मोरे यांनी मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कार्यासह नियोजित कार्याची माहिती सविस्तरपणे सांगितले.
यावेळी न्यासाचे सचिव श्याम मोरे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, शितल फुटाणे, मनोज निकम, प्रवीण घाडगे, विजय माने, सागर याळवार, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, सचिन स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, सुर्यकांत गुरव, विरुपाक्ष कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!