श्री परमेश्वर पालखी महोत्सवासाठी शांतलिंगेश्वर महाराज व कोणेश्वर महास्वामाजी यांना निमंत्रण
वागदरी (ता. अक्कलकोट) – येथील श्री परमेश्वर पर्व पालखी मिरवणूक महोत्सव यंदा गुरुवार 18 सप्टेंबर 2025 व शुक्रवार 19 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, महोत्सवाच्या तयारीस सुरुवात झाली असून प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण दिले जात आहे.
महोत्सवातील अंबील घागरी महोत्सव व महाप्रसाद दर्शन आशिर्वचन या विशेष कार्यक्रमासाठी श्री जयगुरु शांतलिंगेश्वर महाराज (हिरेजेउरगी, ता. अफजलपूर) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच, श्रीची पालखी पूजा करण्यासाठी श्री कोणेश्वर महास्वामाजी (धुतुरगाव, ता. आंळद) यांना निमंत्रण देण्यात आले.
या निमंत्रणप्रसंगी श्री परमेश्वर पर्व पालखी महोत्सव पंच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. महोत्सवाची तयारी भक्तजनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे.
या पारंपरिक आणि धार्मिक पर्वाचे नियोजन भाविकांच्या सहभागाने अधिक भव्य होणार असल्याची माहिती समितीने दिली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!