गावगाथा
सोलापूरच्या डॉ.वाघचवरे भावंडाचे मॅरेथॉन रनिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेमध्ये दि.8 जून 2025 रोजी झालेली 90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर च्या डॉ . वाघचवरे भावंडांनी वेळेत पूर्ण करून एक प्रकारचे जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.

सोलापूरच्या डॉ.वाघचवरे भावंडाचे
मॅरेथॉन रनिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
सोलापूर : दक्षिण आफ्रिकेमध्ये दि.8 जून 2025 रोजी झालेली 90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर च्या डॉ . वाघचवरे भावंडांनी वेळेत पूर्ण करून एक प्रकारचे जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.
1921 पासून दक्षिण आफ्रिकेत डर्बन व पीटर्मॅरीसबर्ग या शहराच्या दरम्यान कॉम्रेड मॅरेथॉन भरवली जाते. या स्पर्धेला अल्टिमेट ह्यूमन रेस असे देखील संबोधले जाते. कारण ही स्पर्धा या दोन शहरांमधील असंख्य , अवघड अशा चढ-उतार असलेल्या टेकड्यांमधून ,बारा तासांच्या आत ,अतिशय प्रतिकूल वातावरणात पूर्ण करावी लागते.
HTML img Tag

8 जून 2025 रोजी वाघचवरे भावंडांनी म्हणजेच डॉ.स्मिता राहुल झांजुर्णे (डेंटिस्ट बहीण) डॉ. सत्यजित सत्यवान वाघचवरे (डेंटिस्ट भाऊ) व डॉ.अभिजीत सत्यवान वाघचवरे (ऑर्थोपेडिक सर्जन भाऊ ) या तिघा भारतीय भावंडांनी ही स्पर्धा पूर्ण केली .
भाऊ- बहिणींनी मिळून ही स्पर्धा पूर्ण करण्याची जगातली ही पहिलीच वेळ होती.