कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हन्नूर प्रशालेत विविध उपक्रम ——–
—————————————-
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांचा १० वा स्मृतिदिन आज हन्नूर येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर यांच्या हस्ते कै. सरांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यातील लहान व मोठ्या गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. शिवानी बाळशंकर,कु.दिव्या निकम या विद्यार्थ्यिनींची भाषणे झाली.यानंतर हन्नूर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. बसवराज बंडगर व सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.चंद्रकांत व्हनमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. यानंतर प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर व डोंबरजवळगेचे पालक श्री.आप्पाशा पाटील यांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सौ. सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.अशोक दंतकाळे , अनंत चैतन्य प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. विलास बिराजदार, सेवानिवृत्त शिक्षक श्री. विश्वनाथ चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे, पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अप्पासाहेब काळे, जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी,समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सांस्कृतिक सहाय्यिका सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी तर आभार सौ. मल्लमा चप्पळगाव यांनी मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!