गावगाथा

*प्रियदर्शनी महिला विकास संस्थेचा “आरोग्य आणि समाजसेवा गौरव पुरस्कार” रुग्णसेवक मंगेश चिवटे यांना प्रदान*

*गुरु कडून शिष्याचे कौतुक... राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते रुग्णसेवक मंगेश चिवटे यांचा गौरव..!*

*प्रियदर्शनी महिला विकास संस्थेचा “आरोग्य आणि समाजसेवा गौरव पुरस्कार” रुग्णसेवक मंगेश चिवटे यांना प्रदान*

*गुरु कडून शिष्याचे कौतुक… राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते रुग्णसेवक मंगेश चिवटे यांचा गौरव..!*

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा गौरविण्यात आले. प्रियदर्शनी महिला विकास संस्थेतर्फे वर्धा येथील चरखा भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर साहेब यांच्या पत्नी सौ. शीतलताई पंकज भोयर (अध्यक्ष, प्रियदर्शनी महिला विकास संस्था) यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धा जिल्हा हा मोतीबिंदू मुक्त व्हावा या हेतूने मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा अभियानाला आज सुरुवात करण्यात आली. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन वर्धा शहरातील चरखा भवनात करण्यात आली. हा उपक्रम २२ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा या अभियानासोबतच विविध आरोग्य शिबिरे देखील राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात आरोग्य संदर्भात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा देखील सन्मान करण्यात आला. मंगेश चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख असताना राज्यातील ५१ हजार गोरगरीब रुग्णांना तब्बल ४१९ कोटींची मदत करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक उंची प्राप्त करून दिली होती.
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची सुलभ व्यवस्था तयार करत कोणताही रुग्ण उपचाराविना राहू नये म्हणून हजारो रुग्णांना निधी देत त्यांचे प्राण वाचविले. रुग्णांना मोठा निधी देत प्राण वाचविले. या योजनेचे सर्व काम पाहणारे मंगेश चिवटे यांनी योजनेत पारदर्शकता आणून योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवली होती. या योजनेसाठी कुठलीही फी लागत नाही संपूर्ण योजना मोफत आहे असे जनतेपर्यंत पोहिचवुन थेट रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आणि त्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुलभ आणि पारदर्शकता असल्याने ५१ हजार रुग्णांना ४१९ कोटींचे वितरण फक्त अडीच वर्षात केल्याने प्रियदर्शनी महिला विकास संस्थेने चिवटे यांना गौरविले.
यावेळी यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेब, आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर साहेब, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर साहेब, आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब, आमदार राजेश बकाने साहेब, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, डॉ विकास महात्मे उपस्थित होते.
*मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे प्रमाण व पॅकेज वाढविणार –
संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची घोषणा
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ विकास महात्मे, आणि रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्या पाठपुराव्याला यश…*

*संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय.*

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान सुरू आहे. परंतु शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना प्रत्येकी शस्त्रक्रिया मागे फक्त दोन हजार रुपये मिळतं होते तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सध्या 27 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत आणि तसेच डॉक्टरांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी विशिष्ट टार्गेट दिले जाते त्या टार्गेट मध्ये वाढ करण्यासंदर्भात व मानधन मध्ये भरीव वाढ करण्याची विनंती पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ विकास महात्मे, आणि रुग्णसेवक मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांस केली होती.
आज वर्धा येथे मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा ह्या शिबिरास उपस्थित असताना केलेल्या विनंतीचा संदर्भ घेत राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लवकरच आपल्या दालनात आरोग्य मंत्री महोदय आणि आरोग्य खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊ आणि यामध्ये भरी वाढ करू अशी घोषणा केली तसेच शस्त्रक्रिया टार्गेट दिले जाते; त्या टार्गेटमध्ये वाढ करण्यासंदर्भात देखील राज्य शासन सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली.

महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा सुलभ आणि सस्ती होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेब, आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर साहेब, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर साहेब, आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब, आमदार राजेश बकाने साहेब, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, डॉ विकास महात्मे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button