गावगाथाठळक बातम्या
दुःखद…! अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांना मातृशोक

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते तथा श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब मोरे यांच्या मातोश्री शांताबाई पांडुरंग मोरे (वय वर्ष – ८२ ) यांचे सोमवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.अंत्ययात्रा आज दुपारी अडीच वाजता कुरनूर( तालुका अक्कलकोट) येथील राहत्या घरापासून (मोरे मळ्यापासून )निघणार आहे.
