हन्नूर येथील अनंत चैतन्य उच्च माध्यमिक प्रशालेत इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत—————— —————————————
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य. व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे इ. ११ वी च्या नवोगत विद्यार्थ्यांचा
” प्रवेशोत्सव” कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात आज संपन्न झाला. प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य श्री. अशोक साखरे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर इ. अकरावीत प्रवेश घेतलेल्या सर्व “नवोगत विद्यार्थी- विद्यार्थिनींचे ”
गुलाबपुष्प व गोड भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री. अशोक साखरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांनी या हन्नूर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय व्हावी याकरिता हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले.विशेषत: दहावीनंतर मुलींची होणारी महाविद्यालयीन शिक्षणाची गळती थांबावी हे
यामागचे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते शहरात जाऊन शिकाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांची गावातच सोय करून अनाठायी होणाऱ्या खर्चापासून वाचवले तेंव्हा त्याचा सदुपयोग करून घ्या. एवढेच नव्हे तर कला शाखेला कमी न लेखता, याविषयी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनी न बाळगता प्रयत्नशील राहिल्यास यश निश्चितच आपल्या पायाशी लोळण घेईल असे सांगून सर्व नवोगत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्यावतीने स्वागत करुन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.ज्ञानदेव शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अप्पासाहेब काळे, जेष्ठ शिक्षक श्री.सरदार मत्तेखाने,श्री.शशिकांतअंकलगे,शिक्षिका सौ.मृदुलादेवी स्वामी,सौ.स्वप्नाली जमदाडे,कलाशिक्षक राजेंद्र यंदे श्री.अब्दुलअझीझ मुल्ला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. काशीनाथ पाटील यांनी केले तर आभार प्रा. रवींद्र कालीबत्ते यांनी मानले.आजच्या प्रशालेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या “स्वागत कार्यक्रमाचे “संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती,सी.ई.ओ.सौ.रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुकासह अभिनंदन केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!