वटवृक्ष मंदिर समितीच्या सन्मानाने भारावून गेलो – बालकीर्तनकार माऊली महाराज जाहूरकर
वटवृक्ष मंदीरातील महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कारानंतर जाहूर, नांदेड येथील बालकीर्तनकार माऊली महाराज यांचे मनोगत
(श्रीशैल गवंडी, अ.कोट,दि.२९/०७/२०२५)
येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने स्वामींच्या निस्सिम भक्तांना जीवन जगण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतूनच आमच्या सारख्या भाविकांच्या स्वामींवरील श्रध्देत वृद्धी होत असते असे मनोगत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जाहूर येथील बालकीर्तनकार तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराजांची छबी लाभलेले ह.भ.प.माऊली महाराज जाहूरकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वामींच्या दर्शनाकरीता येथे आले असता बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी बालकीर्तनकार ह.भ.प.माऊली महाराज जाहूरकर यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना ह.भ.प.माऊली महाराज जाहूरकर
यांनी स्वामींचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहुन भाविकांना आपल्या कीर्तनसेवेच्या माध्यमातून दृढ भक्तीचा आनंद देत आपलेही भविष्यकालीन जीवन
असेच आनंदित जीवन व्यतीत होत रहावे या करीता स्वामींच्या चरणी साकडे घातले असून मंदिर समितीच्या सन्मानाने व आदरतिथ्याने आपण भारावून गेलो असल्याचे मनोगतही ह.भ.प.माऊली महाराज जाहूरकर यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, आदींसह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, भाऊसाहेब महाराज, रूद्र महाराज, वैभव महाराज, नरेंद्र महाराज, ज्ञानेश्वरी दिदी, आशाताई जाहूरकर, बाबा कांबळे, प्रशांत गाडे, लोंढे, सागर गोंडाळ, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, महादेव तेली, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ = बालकीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.