गावगाथाठळक बातम्या

Karnataka : रेणुकस्वामी हत्या प्रकरणात सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन तुगुदीप अटकेत ; काय आहे प्रकरण ..? वाचा सविस्तर

HTML img Tag Simply Easy Learning    

बंगळुरू (प्रतिनिधी): कर्नाटकच्या बंगळुरू इथं रेणुकस्वामी हत्याकांडात आतापर्यंत पोलीस कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील २ प्रसिद्ध चेहऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. ही मोठी नावे आहेत अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा. अभिनेता दर्शन सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

गल्लीतले भटके कुत्रे मृतदेह खेचत होते तेव्हा या हत्येची भनक पोलिसांना लागली. रेणुकाच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीवरून ९ जूनला कामाक्षीपल्या पोलिसांनी अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि त्याला अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दर्शनसह या प्रकरणी ९ जण अटकेत आहेत. या मर्डर मिस्ट्रीमध्ये ३ महत्त्वाचे रोल आहेत. पहिला रेणुकास्वामी, दुसरं कन्नड अभिनेता दर्शन आणि तिसरी भूमिका अभिनेत्री पवित्रा गौडा, अखेर या हत्याकांडात तिघांचे कनेक्शन काय हे जाणून घेऊ. पवित्रा गौडा ही एक कन्नड अभिनेत्री आहे. ती फेमस अभिनेता आणि मर्डर प्रकरणी अटकेत असलेल्या दर्शनची दुसरी पत्नी आहे. दिर्घकाळ रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दर्शनने पवित्रासोबत लग्न केले होते. मिडिया रिपोर्टनुसार रेणुकस्वामी हा दर्शनची पत्नी पवित्राला आक्षेपार्ह मेसेज पाठवून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. ज्यामुळे अभिनेता दर्शन प्रचंड वैतागला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

पवित्राने अभिनेता दर्शनसोबत जानेवारी २०२४ मध्ये सोशल मीडियात अनेक फोटो शेअर केले. हे दोघे मागील १० वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पवित्राच्या पोस्टमुळे सोशल मीडियात खळबळ माजली. कारण दर्शन आधीपासून विवाहित होता. २०१७ मध्येही पवित्रा आणि दर्शनच्या ट्विटर, फेसबुकमुळे अनेक चर्चा रंगल्या. परंतु वाद झाल्यानंतर पवित्राने फोटो हटवले होते. नोव्हेंबरमध्ये पवित्रानं तिच्या मुलीच्या बर्थडेचा केक कापतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यात दर्शनही दिसला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

दर्शन तुगुदीप हा कन्नड सिनेमातील मोठा अभिनेता आहे. तो प्रोड्युसरही होता. २००२ मध्ये त्याने सिनेमात पर्दापण केले. अभिनेता दर्शनने २ लग्न केली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव विजयालक्ष्मी तर दुसऱ्या पत्नीचं नाव पवित्रा गौडा. या प्रकरणी बंगळुरू डीसीपी म्हणतात की, रेणुकस्वामीच्या हत्येची चौकशी सुरू आहे. रेणुकस्वामी हा दर्शनची पत्नी पवित्राला अश्लील मेसेज पाठवायचा. हत्येतील आरोपीने त्याचा खुलासा केला. दर्शनच्या सांगण्यावरून रेणुकाला मारलं. त्यामुळे पोलिसांनी दर्शनसह १० लोकांना अटक केली आहे.

कोण होता रेणुकस्वामी?

रेणुकस्वामी नावाच्या व्यक्तीची हत्या झाली तो कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे राहणारा होता. त्याचा मृतदेह ९ जूनला कामाक्षीपल्या नजीक एका नाल्याजवळ आढळला. कुत्र्यांनी हा मृतदेह कुरतडला होता. रेणुकास्वामीची हत्या ८ जूनला झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची हत्या सुमनहल्ली ब्रीजवर करून मृतदेह नाल्यात फेकला. तो चित्रदुर्गच्या एका फार्मसीत काम करत होता. तो अभिनेता दर्शनच्या पत्नीला आक्षेपार्ह मेसेज पाठवायचा असा आरोप आहे. कथितपणे अश्लील मेसेज पाठवण्यावरूनच अभिनेता दर्शनने रेणुकास्वामीचा काटा काढल्याचं बोललं जाते. दरम्यान, पोलीस या प्रकरणी प्रत्येक अँगलने चौकशी करत आहे. रेणुकास्वामी गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रेणुकच्या हत्येची माहिती पोलिसांना मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button