*”*दडपणाशिवाय व्यक्त होणे म्हणजे स्वातंत्र्य* ‘श्रीमती सुनिता कामाठी*
——————————-
श्री रामलिंगेश्वर शिक्षण संस्थेत ध्वजारोहण
———————————-
श्रीक्षेत्र तीर्थ( ता.द.सोलापूर)दि. १५ ऑगस्ट २०२५
श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार सर होते .
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपितामा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
श्रीमती सुनिता कामाठी महाराष्ट्र (प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा) यांच्या शुभहस्ते ७९वा स्वातंत्रदिन ध्वजारोहण करण्यात आले.तसेच स्वातंत्र दिनाविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत, नृत्य,देशभक्तीपर गीत, स्वतंत्रता संग्रामातील नाटकाचे सादरीकरण केले.धर्मवीर सुनील भाऊ कामाठी याच्या स्मरणार्थ आनंद कामठी यांच्याकडून 25 डझन वही वाटप व स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश मालक इंगळे व श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे सेवेकरी श्री गिरीश पवार यांच्याकडून इयत्ता ९वी १०वी व ११वी होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना कै.बाळासाहेब इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या स्मरणार्थ पुस्तक व कै.रूपालीताई इंगळे यांच्या स्मरणार्थ वही वाटप त्यांचे प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी श्री जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी श्रीमती कामाठी आपले विचार मांडताना म्हणाल्या की, दडपणाला न जुमानता व्यक्त होण्याची भावना म्हणजे स्वतंत्रता. ग्रामीण भागातील विद्यार्थी चिकित्सक व कष्टाळू असतात त्यांना अभ्यासाची गोडी लागल्यास यशस्वी होण्याचे मार्ग मोकळे होतात.आपल्याला स्वातंत्र सहजासहजी मिळालेले नाही. शूर क्रांतीवीर,स्वातंत्र सैनिक,देशभक्त यांच्या बलिदानातून मिळालेले आहे. त्यांच्या स्मृतीस नमन करून आदर्श घेण्याचे दिवस म्हणजे आजचा दिवस. स्वातंत्र्य दिन आपल्याला जाणीव करून देतो की, आपण आपल्या देशाच्या नैतिकतेचा आदर केला पाहिजे ,आणि जपलं पाहिजे.असे मत व्यक्त केले.
प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, विद्यार्थी मित्रानो 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य लाखो देशभक्त सुपु त्रांच्या प्राणाच्या आहुतीतुन मिळालेले आहे. या जाणीवेतून आपल्या देशाला विश्वगुरु बनवण्याची जबाबदारी तुमच्या सारख्या तरुणांच्या हाती आहे. ते यशस्वी करण्यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी श्री राजकुमार बाळीकाई १0 कि. लाडू ,श्री धोंडप्पा तोरणगी १ बिस्कीट बॉक्स व गावतील असंख्य नागरिक गोळ्या, चॉकलेट,बिस्किटे विद्यार्थांना खावू वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी केले सूत्र संचालन प्रा. सावित्री बिराजदार पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन महेश पट्टणशेट्टी यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक शिवराज बिराजदार,गणेश कामाठी,आकाश खजुरे, सतीष सलगर,मनोज बनसोडे,शुभम कोटे, ऋषीकेश पांढरे,उत्तम केंगार, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!