गावगाथा

ग्रंथालयातील ग्रंथधन जीवनाचा मार्ग दाखवते – प्रा.डॉ.सुहास पुजारी

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन

ग्रंथालयातील ग्रंथधन जीवनाचा मार्ग दाखवते – प्रा.डॉ.सुहास पुजारी
भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन

” ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचा खजिना. त्यातील प्रत्येक ग्रंथ हे वाचकाला मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहे.
धार्मिक, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, इतिहास, कला इत्यादी प्रत्येक क्षेत्रातील पुस्तकांमुळे माणूस आपले विचार घडवू शकतो, समस्यांचे निराकरण शोधू शकतो, तसेच आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतो. ग्रंथालयातील ग्रंथधन माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेते, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणते. त्यामुळे ग्रंथालय हे केवळ शिक्षणापुरतेच नव्हे तर सद्विचार, सद्गुण आणि संस्कारांचेही केंद्र आहे. विद्यार्थ्याला अभ्यासासाठी संदर्भग्रंथ वाचून करिअरचा योग्य मार्ग सापडतो.साहित्य वाचून मनुष्य संवेदनशील, विचारशील व सुसंस्कृत होतो.चरित्रग्रंथ वाचून जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच, ग्रंथालयातील ग्रंथधन हे केवळ माहितीचा साठा नसून मानवाच्या जीवनप्रवासाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहे.” असे मौलिक विचार कला विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. सुहास पुजारी यांनी व्यक्त केले. ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनी संगमेश्वर कॉलेजच्या ग्रंथालय इमारतीत बोलत होते. याप्रसंगी समन्वयक प्रा.डॉ.राजकुमार खिलारे, ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी,सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी, रात्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश फंड आदी उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रास्ताविकात संगमेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचा आढावा घेतला. उपलब्ध ग्रंथांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले . त्यानंतर उपलब्ध वेळेत प्रा.डॉ.सुहास पुजारी यांनी दिलखुलास संवाद साधला. संतोष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी संतोष पवार,कोमल कोंडा ग्रंथालयातील कर्मचारी श्रीशैल हुंडेकरी,राजेंद्र घुगे, रेवप्पा कोळी,संजय कुंभार,नागेश कामाणे आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button