*मुरूमच्या प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याची एम.बी.बी.एस. साठी निवड*
(मुरुम बातमीदार)
*उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरूम चा माजी विद्यार्थी शेख अब्दुलरहेमान सईदअहमद या विदयार्थ्याची ई.एस.आय.सी. मेडिकल कॉलेज, कलबुर्गी येथे प्रतिष्ठित एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.*
*शालेय जीवनापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवणारे शेख अब्दुलरहेमान यांनी चिकाटी, कष्ट आणि मार्गदर्शनाच्या जोरावर ही यशाची शिखरे गाठली. त्यांच्या या यशामुळे शाळा, मुरूम शहर आणि कुटुंबियांचा अभिमान द्विगुणित झाला आहे.*
*या यशाबद्दल नगर शिक्षण विकास मंडळाचे विश्वस्त बसवराज पाटील ,अध्यक्ष बापूराव पाटील ,शरण पाटील, सचिव व्यंकटराव जाधव यांनी अभिनंदन केले . संस्थेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आले होते .यावेळी माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर ,शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या शुभहस्ते शेख अब्दुलरहेमान सईदअहमद याचे सत्कार केले.*
*प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर धनराज हळळे ,संगमेश्वर लामजने यांनी अभिनंदन केले .*
*यावेळी पर्यवेक्षक विरेंद्र लोखंडे , सुभाष धुमाळ ,पंकज पाताळे सागर मंडले ,जगदीश सुरवसे ,सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले .*
*“भविष्यात ते एक यशस्वी डॉक्टर होऊन समाजसेवेची नवी उंची गाठतील,” असा विश्वास सर्व शिक्षकांनी आपल्या अभिनंदनपर मनोगतातून व्यक्त केले .*
*या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक जगदीश सुरवसे यांनी केले .*
Back to top button
×
No WhatsApp Number Found!