जि.प.शाळेने केला भारतमातेच्या स्वातंत्र्याचा 79वा वर्धापन दिन उत्साहात साजरा .
अक्कलकोट (प्रतिनिधी ) जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत भारतमातेचा स्वातंत्र्यदिन अतिशय जल्लोषात आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक शिक्षणप्रेमी मारुती शिंदे हे होते .डॉ .बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन पालक सोमलिंग स्वामी व गजानन सुरवसे यांनी केले .ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ .रेखा लक्ष्मण सोनकवडे यांनी केले .राष्ट्रगीत राज्य गीत ध्वजगीत म्हणण्यात आले . विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर भारतमातेच्या वेषात तयार होऊन आले होते .संगीतमय कवायत घेण्यात आली .विद्यार्थ्यानी भाषणं केली देशप्रेम हे फक्त शब्दापुरते नसून ते आपल्या कर्तव्यातून दिसले पाहिजे .असे बोलताना शिवशरण सुरवसे म्हणाले .सौरऊर्जा प्रकल्पाचे सडोळकर साहेब माने साहेब विठ्ठल पाटील महादेव पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलं आणि शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले .ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रोट्टे यांनी पण शुभेच्छा दिल्या . 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे .अनेक वर्षाच्या संघर्षानंतर बलिदानानंतर आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले .महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक सरदार पटेल यासारख्या महान नेत्यांनी देशासाठी लढा दिला आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही एक भेट नाही तर ती आपल्या जबाबदारीची जाणीव आहे असे माहिती सांगताना मारुती शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले .रेखा सोनकवडे बाबासाहेब बनसोडे अनुसया कलशेट्टी तोलन बागवान मनिषा कुणाळे अर्चना गिरी कविता फड या सर्व शिक्षकांनी नियोजन करून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला .पालक उपस्थित होते .धूळव्वा खसगी चनम्मा परीट लक्ष्मीबाई परीट पार्वती ठोंबरे यांनी विद्यार्थ्याना खाऊ वाटप केले सहकार्य केले .विविध कार्यक्रमानी भारताचा स्वातंत्र्यदिन अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे यांनी केले तर आभार बागवान यांनी मानले .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!