अनंत चैतन्य प्रशालेत “गोपाळकाला दहीहंडी चा जल्लोष “—————————-
—————————————- श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यालाच गोकुळाष्टमी असेही म्हणतात. आणि याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला श्रीकृष्णाच्या बाललीलेचे प्रतीक असलेला व गोकुळात गाई चरायला गेल्यानंतर आपल्या सवंगड्यासोबत स्वतः व गोपालकांनी आणलेल्या भाजीभाकरीचा, शिदोरीचा काला करून केलेल्या सहभोजनाचा एक भाग म्हणून श्रीकृष्णाला आवडत असलेल्या दही, दुध, लोणी चा काला करून व भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा प्रसाद म्हणून हा “गोपाळकाला दहीहंडी उत्सव ” मोठ्या आनंदाने साजरा करण्याची प्रथा आहे.याच औचित्याने आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे “गोपाळकाला दहीहंडी उत्सव ” मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी ” श्रीकृष्णजन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव ” याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्याच हस्ते ” बालश्रीकृष्ण मुर्तीचे पुजन करून आरती करण्यात आली. यावेळी श्रवण सोरेगाव ( इ. ५वी),सुरज गर्जे ( इ. ७ वी) ही मुले श्रीकृष्ण व कु. स्वाती धर्मसाले ( इ. ५ वी),आदिती भरमशेट्टी ( इ. ७ वी) या मुली राधा तर साई घोडके ( इ. ८ वी) हा सुदामा बनला होता. यावेळी कु. शिवानी बाळशंकर या इ. ७ वी च्या विद्यार्थिनींने ” अच्युतम् केशवम् , कृष्ण दामोदरम् ” या गाण्यावरती सुंदर नृत्य सादर केल्यानंतर
दहीहंडी फोडण्याच्या उत्सवास सुरुवात झाली. या साठी इ. ५ वी ते ७ वी लहान गट तर इ. ८ वी ते १० वी मोठा गट असे निश्चित करण्यात आले होते.या दहीहंडी च्या साहसी खेळात मनोरे रचून मुलेच नव्हे तर मुलींच्या ही पथकाने दहीहंडी फोडण्याचा व सहभागी होऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र इ. ७ वी च्या लहान गटातील संकेत धर्मसाले च्या गोविंद पथकाने जेंव्हा दहीहंडी फोडले तेंव्हा
” गोंविदा आला रे ,आला “असा एकच जल्लोष झाला. तर मोठ्या गटात इ. ९ वी च्या सागर व्हनमाने च्या संघाने व इ. १० वी च्या श्रीशैल मणूरे च्या पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. हा प्रशालेतील “दहीहंडी उत्सव ” यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक ज्ञानदेव शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख अप्पासाहेब काळे, सहाय्यिका सौ. स्वप्नाली जमदाडे , जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी, जेष्ठ शिक्षक
सरदार मत्तेखाने , शहाजी माने,सुरेश जाधव, शशिकांत अंकलगे,अब्दुलअझीझ मुल्ला,प्रा. काशीनाथ पाटील, प्र. सहाय्यक स्वामीनाथ कोरे, शिवप्पा घोडके, विश्वनाथ सैदे, जैनुद्दीन जमादार, काशीनाथ हताळे,केदार कोरे यांनी खुप परिश्रम घेतले. हा प्रशालेतील
” गोपाळकाला दहीहंडी उत्सव ” व्यवस्थितपणे संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड मा. श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक मा. श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी सर्वांचे कौतुक केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!