विद्यार्थी भित्तिपत्रकातून बौद्धिक संकल्पना साकारतो :मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त भित्तिपत्रकांचे प्रकाशन
अक्कलकोट
वाचन, चिंतन, मनन करून विद्यार्थी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून बौद्धिक संकल्पना आपल्या लेखन शैलीतून व्यक्त करू शकतो. म्हणून भित्तिपत्रके विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त आहेत त्यासाठी शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भित्तिपत्रके प्रकाशित करून विद्यार्थ्यांना लेखन करण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विद्या शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भित्तिपत्रक काढण्यात आले, त्याचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मुकुंद पत्की, महावीर शहा, संचालिका सौ शांभवीताई कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती,संचालक अशोक येणगुरे, महेश कापसे, जुनिअर विभाग प्रमुख सौ पुनम कोकळगी,प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, बापूजी निंबाळकर,खंडेराव घाटगे,शिवानंद पुजारी उपस्थित होते.
महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विवेक भित्तिपत्रकामध्ये शेतकरी शेतमजुरांच्या व्यथा, पाऊस, श्रावणसरी लेख, कथा तर वाणिज्य संशोधन मंडळाच्या भित्तिपत्रकात अर्थसंकल्प, जीएसटी, कर प्रणाली, भारतावरील अमेरिकाचे टेरीफ म्हणजे आयात निर्यात कर तसेच विज्ञान विद्याशाखेच्या अग्निपंख भितीपत्रकात विज्ञानाने केलेली प्रगती, भारत पाक युद्धात वापरलेले ब्रह्मोस अस्त्र आदीची माहिती विद्यार्थ्यांनी लिहिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक भित्तिपत्रकाचे संपादक प्रा भीम सोनकांबळे यांनी केले सूत्रसंचलन वाणिज्य भित्तिपत्रकाचे संपादक प्रा शितल फुटाणे यांनी केले तर आभार अग्निपंख भित्तिपत्रकाचे संपादक प्रा मनीषा शिंदे यांनी मानले.
भित्तिपत्रक उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी कौतुक केले.
चौकटीतील मजकूर
भित्तिपत्रक काचफलकाची आकर्षक सजावट
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाकडून काढण्यात आलेल्या भित्तिपत्रक काचफलकात रेखाचित्रे, तिरंगा झेंडा विषयास अनुसरून रंगीबेरंगी चित्रे लावण्यात आली होती. या आकर्षक सजावटीचे ज्येष्ठ संचालक मुकुंद पत्की यांनी कौतुक केले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील भित्तिपत्रकाचे प्रकाशन करताना संस्था पदाधिकारी व मान्यवर.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!