आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे रोजगार मेळावा
(मुरुम बातमीदार)
दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
हा उपक्रम आदर्श महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्लेसमेंट सेल व पुणे येथील जॉब कनेक्ट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
🎯 या मेळाव्याचे उद्दिष्ट —
विद्यार्थ्यांनी पदवी/पदव्युत्तर शिक्षणातून मिळवलेले ज्ञान व्यावहारिक जगतात उपयोगात आणता यावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये, मूल्ये व गुण विकसित व्हावेत.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदर्श महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राम सोलंकर हे होते. तर
प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. ऋषिकेश खोत, श्री. जगताप व कंपनीचे संपर्क अधिकारी श्री. गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले तर आभार डॉ. अंकुश टाकळे यांनी मानले.
प्राचार्य डॉ. राम सोलंकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की —”ही सुवर्णसंधी साधून प्रत्येक विद्यार्थ्याने आपले भविष्य उज्ज्वल घडवावे.” रोजगार मेळाव्याचा लाभ २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरला आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. विनायकराव पाटील साहेब, सरचिटणीस मा. बसवराजजी पाटील साहेब, चिटणीस मा. रामकृष्णपंत खरोसेकर साहेब यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!