गावगाथा

सदलापूरच्या पवनकुमार कुंभार याने परिस्थीतीशी संघर्ष करून नीट परिक्षेत मिळवलेले उज्वल यश प्रशंसनीय – महेश इंगळे

वैद्यकीय शिक्षण प्रवेश (NEET) परिक्षेत पवनकुमार कुंभार हा ५१० गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर कुंभार यांच्या सत्कारा प्रित्यर्थ महेश इंगळे यांचे मनोगत

सदलापूरच्या पवनकुमार कुंभार याने
परिस्थीतीशी संघर्ष करून नीट परिक्षेत मिळवलेले उज्वल यश प्रशंसनीय – महेश इंगळे
वैद्यकीय शिक्षण प्रवेश (NEET) परिक्षेत
पवनकुमार कुंभार हा ५१० गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर कुंभार यांच्या सत्कारा प्रित्यर्थ महेश इंगळे यांचे मनोगत
(श्रीशैल गवंडी, दि.१९/०८/२०२५.अ.कोट)
आपल्या तालुक्यातील सदलापूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगीही शैक्षणिक गुणवत्ता किती ठासून भरली आहे याचा प्रत्यय आज सदलापूरचा विद्यार्थी पवनकुमार कुंभार याच्या नीट परिक्षेतील यशाकडे पाहून आला. सदलापूरच्या पवनकुमार कुंभार याने
परिस्थीतीशी संघर्ष करून नीट परिक्षेत मिळवलेले हे उज्वल यश प्रशंसनीय असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. नुकतेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या NEET परिक्षेत पवनकुमार कुंभार या विद्यार्थ्याने स्वता स्वयंपाक करून आपल्या जेवणाची सोय करीत ऑल इंडीया रँकमध्ये ४०८४० क्रमांक व महाराष्ट्र राज्यात ३२५२ रँक व ५१० गुणांनी उत्तीर्ण होवून उज्वल यश संपादन केल्याप्रित्यर्थ व पुढील वैद्यकीय शिक्षणाकरीता बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्याप्रित्यर्थ मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी विद्यार्थी पवनकुमार कुंभार याचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, मिठाई देऊन यथोचित सत्कार केला व त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत निर्भेळ यश प्राप्त करुन कुंभार यांनी आपली वैद्यकीय सेवा तालुक्यातील जनतेसाठी समर्पित करण्यासाठी श्री स्वामी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून कुंभार कुटूंबियांना आवहन केले. या प्रसंगी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी पवनकुमार कुंभार याचे (NEET) नीट चे शिक्षण आरसीसी लातूर येथे झाले आहे.
प्रा.शिवराज मोटेगावकर सर यांनी स्थापन केलेली आरसीसी ही भारतातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी एक आघाडीची प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत प्रा.प्रशांत सुर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने व कुंभार यांचे पालक किरणकुमार कुंभार यांनी आपल्या अल्पभुधारक शेती व्यवसायातून व आपल्या दुर्बल आर्थिक परिस्थीतीतून पवनकुमार कुंभार याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने व कुंभार याने आपल्या परिस्थितीची व वडीलांच्या कष्टाची जाण ठेवून आभ्यास केल्याने हे यश पवनकुमार कुंभार याला प्राप्त करता आल्याचे मनोगतही महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, विरुपाक्ष कुंभार, किरणकुमार कुंभार, चंद्रकांत कुंभार, आनंदप्पा कुंभार, प्रा.मनोज जगताप सर, सागर गोंडाळ, विपूल जाधव, गिरीश पवार, गणेश इंगळे, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ मुमूडले, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – पवनकुमार कुंभार याचा नीट परिक्षेतील यशाप्रित्यर्थ सत्कार करताना महेश इंगळे, किरणकुमार कुंभार व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button