नाभिक समाजाच्या येथे संत सेना महाराज पुण्यतिथी समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न
सोलापूर – नाभिक समाज होटगी रोड, विजापूर रोड, जुळे सोलापूर, हत्तुरे नगर च्या वतीने लिं.सौ. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात संत सेना महाराजांची पुण्यतिथी समाधी सोहळा कीर्तनाने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे व नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी सर,मल्लिकार्जुन राऊत, रामलू कोंडुर ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वर मठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनाने करून सकाळी 12:00 वाजता गुलाल उधळून अभिवादन करण्यात आले.
‘सेवाधर्म हेच खरे कर्म’ आपल्या अभंगातून सर्वांना सेवाभावाची शिकवण देणारे संत आहेत असे प्रतिपादन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले.
ह.भ.प. दत्तात्रय रामचंद्र क्षीरसागर महाराज (उळेगाव) यांनी आपल्या कीर्तनात संत सेना महाराज – विठ्ठलाचे निःसीम भक्त होते. न्यायनीतीस अनुसरून वागणे, यात जीवाचे रहस्य आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यातील कर्तव्य पार पाडण्यातही ईश्वरी सेवेचा मोबदला हाती लागतो. अशी त्यांची श्रद्धा होती.”संत नामदेवांप्रमाणे महाराष्ट्राबाहेर येऊन सेनार्जींना उत्तर भारतातील हिमाचल प्रवेश, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार या राज्यात रामभक्तीचा प्रचार सुरू करून उच्चनीच जातिभाव सोडून समान पातळीवर जगण्याचा संदेश दिला. सेनार्जींनी हिंदी, मारवाडी, पंजाबी इत्यादी भाषेत भक्तीवर आधारित काही पदे लिहिली आहेत. त्यातील पंजाबी पदांचा शिखांचे ‘गुरुग्रंथ साहिब’ या धर्मग्रंथात समावेश केलेला आहे. अशी सेना महाराजांची महती आपल्या रसाळ वाणीतून सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक रामलू कोंडूर, ब्रह्मदेव माने सहकारी बँकेचे संचालक सचिन चौधरी,शोभा राऊत,शारदा श्रीमंगले बिराजदार,अलका ताटे अमोघसिद्ध राऊत,सुनीता दळवी, प्रभाकर राऊत, गणेश राऊत,सागर राऊत,पांडूरंग सुर्यवंशी,धोंडीबा विभूते,प्रवीण वाघमारे, राम वाघमारे,श्रीराम वाघमारे,राजु वाघमारे,नागेश कोरे,अर्जुन राऊत,शिवा हडपद, मोहन पंद्दील्ला,सिध्दाराम वाघमारे, राजु राऊत,अनिल राऊत,अंबादास राऊत,राहुल राऊत,पिरप्पा वाघमारे,संतोष राऊत,महादेव पवार,बाबुशा लोखंडे,भिमाशंकर राऊत,गणेश राऊत,अनिल हडपद,प्रभु भाले,श्रीकांत इंगळे, सुनिल इंगळे,धोंडीराम वाघमारे नागराज कोंडूर,श्रीशैल हडपद,नागेश कोरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!