गावगाथा

नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी ग्लोबल व्हिलेज कटिबद्ध : डॉ. माळगे*

७६व्या गणतंत्र दिनी प्रमुख पाहुण्यांचे गौरवोद्गार

*नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी ग्लोबल व्हिलेज कटिबद्ध : डॉ. माळगे*
=========================
७६व्या गणतंत्र दिनी प्रमुख पाहुण्यांचे गौरवोद्गार
=========================
बोरामणी येथील कै.ब.ई. चनशेट्टी गुरुजी संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील आकाश हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अनिता अमोल माळगे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. प्रमुख पाहुण्यांनी प्रजासत्ताक दिनाचा ऐतिहासिक दृष्टिकोन आणि संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये पालकांच्या योगदानाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. किशोरी शहा, श्री. कमलाकर भोसले, श्री. अरुण शिंदे, श्री. संतोष भोसले तसेच पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. पंडित आचलारे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

नुकत्याच निवडून आलेल्या पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांचा सत्कार डॉ. अनिता माळगे यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. अनिता माळगे यांनी एटीएल (अटल टिंकलिंग लॅब) मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे निरीक्षण केले. त्यांनी या प्रकल्पांमध्ये इंजिनिअरिंगच्या विषयांचा समावेश असल्याचे सांगून, पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तांत्रिक शिक्षण दिले जात असल्याबद्दल शाळेचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची प्रशंसा केली.

विद्यार्थ्यांनी भाषण, मार्चपास्ट आणि युकेजी चा विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाट्य सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले. प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button