कमलाकर सोनकांबळे पत्रकारिता कोर्समध्ये प्रथम क्रमांकाने उतीर्ण
अक्कलकोट,प्रतिनिधी
गौगांव (ता.अक्कलकोट) येथील दैनिक यश सिद्धी न्यूजचे संपादक कमलाकर सोनकांबळे यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या पत्रकारिता कोर्समध्ये मध्ये ए ग्रेड पदवी घेऊन उतीर्ण झाले आहेत.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोरगरीब व गरजू लोकांचे सेवा करताना कमलाकर सोनकांबळे यांना अनेक अडचणी आल्या पण खचून न जाता,समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत हेतू बाळगून सामाजिक कार्य निरंतर ठेवले.

सामाजिक बांधिलकी जपत सन २००० पासून वृत्तपत्रात काम सुरु केले.सुरुवातीच्या काळात दैनिक लोकमत युवामंच व दैनिक संचार मध्ये ‘तरुणाई या सदरात कॉलेज जीवनात पत्रकारिता अनुभवले.
तसेच साप्ताहिक सत्यप्रिय या वृत्तपत्रात कार्यकारी संपादक व कालीगंगा या साप्ताहिक मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम पहिले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,अक्कलकोट शाखेचे अध्यक्षपदी निवड झाली.आणि ते मोठी जबाबदारी स्वीकारले अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक काम केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तीन वेळेस अध्यक्ष पदाची संधी मिळाली.सध्या ते दैनिक यश सिद्धी न्यूज संपादक म्हणून काम बघत आहे.त्यांनी पत्रकारिता कोर्स मध्ये ए ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले.प्रा.डॉ.सूर्यकांत गायकवाड, सरपंच वनिता सुरवसे,प्रदीप जगताप,प्रा.सुनील गायकवाड,मधुकर सुरवसे आदी सह विविध क्षेत्रातून अभिनंदन केले व पुढील शुभेच्छा दिल्या.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!