पिंपरी चिंचवडचे भाजपा मंडल उपाध्यक्ष विकास जाधव यांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार.
(श्रीशैल गवंडी, दि.२५/०१/२६.अ.कोट)
पुणे शहरातील पिंपरी चिंचवडचे भारतीय जनता पार्टीचे मंडल उपाध्यक्ष विकास जाधव परिवाराच्या वतीने श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करण्यात आला.
सलग ७ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल विकास जाधव यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा संत तुकाराम महाराज पगडी व कृपावस्त्र घालून तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट देवून यथोचित सत्कार केला व इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे व जाधव परिवारातील
मोहन जाधव, स्वाती जाधव, मनस्वी जाधव, श्रीवि जाधव, सिद्धी जाधव
व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – संत तुकाराम महाराज पगडी व कृपावस्त्र घालून नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना
पिंपरी चिंचवडचे भाजपा मंडल
उपाध्यक्ष विकास जाधव व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!