श्री वटवृक्ष मंदिरात सोमवारी गुरुप्रतिपदा उत्सव.सायंकाळी ५ ते ९:३० यावेळेत शहरातून पारंपारीक पालखी सोहळा
(श्रीशैल गवंडी, दि.२९/०१/२६.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी माघ वद्य प्रतिपदा [गुरुप्रतिपदा] उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे.
गुरुप्रतिपदे रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न होईल. त्यानंतर पुरोहितांच्या हस्ते श्री गुरुपुजन सोहळा संपन्न होईल. यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत देवस्थान समितीच्या वतीने
जोतीबा मंडपात पुरोहितांच्या वैदीक मंत्रोच्चारात देवस्थानचे लघुरुद्र अभिषेक संपन्न होईल. स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील सामुहिक बॅचच्या माध्यमातून अभिषेकास बसता येईल. त्यांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात येईल. दुपारी ११:३० वाजता श्रींची महानैवेद्य आरती संपन्न होईल. देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानकडून सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य पालखी सोहळा संपन्न होईल. हा पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक मार्गे, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, स्वामी गल्ली मार्गे रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरात येईल. वटवृक्ष मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर देवस्थानकडून उपस्थित सर्व भाविकांना शिरा प्रसाद वाटप करणेत येऊन गुरु प्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल.
सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते संपन्न होतील. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सोय करण्यात आली आहे. गर्दीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या व पालखी सोहळा दर्शनाचा, सेवेचा, व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!