स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

श्री वटवृक्ष स्वामी महाराज गुरुप्रतिपदा उत्सव साजरा ;महेश इंगळे, अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी मिरवणूकीचे शुभारंभ.

दिनविशेष

श्री वटवृक्ष स्वामी महाराज गुरुप्रतिपदा उत्सव साजरा ;महेश इंगळे, अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी मिरवणूकीचे शुभारंभ.
(श्रीशैल गवंडी, दि.०२/०२/२६.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली. सकाळी ८:३० वाजता प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते देवस्थानचे लघुरुद्र संपन्न झाले. दुपारी ११:३० वाजता श्रींना महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्तानां भोजन महाप्रसाद देण्यात आले. याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला. दुपारी १ ते ३ या वेळेत दिवसभर हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकारिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी प्रयत्नशील होते.
सायंकाळी ५ वाजता श्रींच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात पुरोहित मंदार महाराज, व्यंकटेश पुजारी, मोहित महाराज
यांचे हस्ते आरती करून व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचे हस्ते पालखी पूजन करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. पालखी मिरवणुक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधि मठ, परतीचा मार्ग कारंजा चौक, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, मधला मारुती, भारत गल्ली, देशमुख गल्ली, मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्रि साडे नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरु भजन होवून उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून या गुरूप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंदार महाराज पुजारी, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, चंदकांत गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील सर, डॉ.हिरण्णा पाटील,
अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे,
शशिकांत लिंबीतोटे, प्रदिप हिंडोळे, दिपक जरिपटके, अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रविण घाटगे, प्रसाद सोनार, महेश काटकर, संजय पवार, बाळासाहेब घाटगे, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, संतोष जमगे, लखन सुरवसे, संजय बडवे, निखील पाटील, आदीत्य गवंडी, दादा सावंत, नागनाथ जेऊरे, तुषार मोरे, स्वप्निल गायकवाड, युवराज सोनटक्के, दर्शन घाटगे आदींसह देवस्थानचे सेवेकरी व अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.
फोटो ओळ = पालखी मिरवणूक शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, अमोलराजे भोसले, मंदार महाराज पुजारी व इतर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button