*गोगांव येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा,सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण*
(जि. प. प्रा. शाळा गोगांव येथील बाल चिमुकल्या कलाकाराने प्रजासत्ताक दिन गाजविला)
——————————————————–
अक्कलकोट(प्रतिनिधी ):
अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रा. प.सदस्य श्री लक्ष्मण बिराजदार हे होते, प्रमुख उपस्थितीत उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, प्रदीप जगताप, शरणप्पा कलशेट्टी, ग्रामपंचायत अधिकारी विक्रम घाटे यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ लिंगराज नडगेरी,अंबिका वळसंग , मधुमती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण कट्टा पूजन माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री सूर्यकांत जिरगे यांनी केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रम अध्यक्ष स्थानी सरपंच सौ वनिता सुरवसे होत्या व प्रमुख उपस्थितीत उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,प्रदीप जगताप विक्रम घाटे होते. प्रतिमा पूजन पोलीस पाटील सौ.चंद्रकला गायकवाड, कल्याणराव बिराजदार यांनी केले ध्वजारोहण कट्ट्याचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शरणबसप्पा मुळजे यांनी केले.
दि.२६ जानेवारी २o२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचे कलागुनाना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील शालेय विद्यार्थी अर्थात बालचिमुकल्या कलाकाराने रंगमंच गाजवून टाकला. मनोरंजनातून शिक्षण, पाणीटंचाई,अंधश्रद्धा व महामानवांच्या विचाराचे प्रबोधन असे अनेक विषय मांडण्यात आले. तसेच लेझीम, नाट्यसंगीत, देशभक्ती वरील गाण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी शिक्षक आणि विध्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पालकांचा ओघ वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या घटत असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.याविषयी “माझी मराठी शाळा” हे गीत सादर करून विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शिक्षणाविषयी पालकाना जागृत केले. दिवसेन दिवस वृक्षतोड,जंगलतोड मोठ्या प्रमाणात करून सिमेंटचे जंगल उभारले जात आहेत त्यामुळे पर्जन्यमान कमी होऊन पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.याविषयी संत एकनाथ महाराजांच्या भारुड गीत प्रकारातून शालेय विद्यार्थ्यांनी “वरूण राजाची माया संपली आकाश कोपलं पाणी हरवल पाणी हरवल ” हे भारुड गीत सादर करून पाणीटंचाई विषयी गावकऱ्यामध्ये जागृती करून दिली. तर “बुरगुंडा होईल तुला” हे भारुड गीत सादर करून बिराजदार या विद्यार्थ्याने उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मने जिंकली.सर्वांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध केले व वन्स मोर चा सन्मान मिळवला. तसेच “रडू नको बाळा मी पाण्याला जाते” या गीतावर सामूहिक नृत्य सादर करून शालेय विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधले तर लावणी या नृत्य प्रकारातून आरोही अकाडे यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर शालेय विद्यार्थ्यांनी मंचावर अक्षरशा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार उभा करून व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर करून महामानवांच्या विचारांचा जागर केला.अशा प्रकारे एकाहून एक वरचढ कला सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांचे दर्शन घडविले.
एकूणच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून शाळेचे मुख्याध्यापक मा.पुंडलिक वाघमारे श्री शंकर कारभारी यांनी पालकांना, ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत प्रसन्न ठेवले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका भोसले मॅडम, यासह शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य परिश्रम घेतले. यावेळी पालक,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ,महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!