वागदरी जिल्हा परिषद मतदार संघात राजेश्री शेळके महिला उमेदवारांचा ‘होम टू होम’ प्रचार ठरतोय लक्षवेधी

HTML img Tag
वागदरी —- घरोघरी प्रचार यंत्रणा राबवण्यातून मतदारांच्या होताहेत गाठीभेटी; साधला जातोय संवाद मतदारांच्या सुख-दुःखात धावून येण्याचं दिलं जातंय अभिवचन गावोगावी सुरू असलेल्या या प्रचार दौऱ्यात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. वे प्रत्येक घराघरात विकासाबाबत सकारात्मक संवाद घडत आहे.

HTML img Tag
अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत वागदरी जिल्हा परिषद गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार राजेश्री बसवराज शेळके यांनी डोर टू डोर प्रचार करत मतदारांची भेट घेत प्रचारात आघाडी घेतली आहे जिल्हा परिषद गटातील भुरिकवठे,गोंगाव ,खैराट,शिरवळ,बादोले, सापळा सह इतर गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांशी भेट घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले आहे.वागदरी येथील भाजपाचे कार्यकर्ते बसवराज शेळके यांच्या पत्नीला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी
उमेदवारास उमेदवारी दिली आहे.वागदरी जि. प.मतदार संघातील विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाच्या उमेदवार राजेश्री बसवराज शेळके
यांच्यासह वागदरी गटातील सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

या प्रचार फेरीत माजी सरपंच रवी वरनाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत, रमेश मंगाणे,प्रकाश पोमाजी, संतोष पोमाजी, मंत्री पोमाजी,पंकज सुतार, महादेव सोनकवडे,श्याम बाबर,गोंगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,सतिश कणमुसे,माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाणप्पा मंगाणे,घाळय्या मठपती, परमेश्वर शेळके (पैलवान) बसवराज शेळके, सह असंख्य भाजप कार्यकर्ते, महिला मंडळी त्या त्या गावातील नागरिक मतदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत
Back to top button
×
No WhatsApp Number Found!