गावगाथा

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून सर्वक्षेत्रीय नेतृत्वाची निर्मिती – डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

दिनविशेष

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून सर्वक्षेत्रीय नेतृत्वाची निर्मिती – डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
अक्कलकोट (प्रतिनिधी)
माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेतून घडणारे स्वयंसेवक हे येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात प्रभावी नेतृत्व करतील असे मत सेवानिवृत्त जिल्हाधिकारी तथा यशदा चे प्रमुख अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. सी. बी. खेडगी महाविद्यालय कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी च्या संचालिका तथा माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी या होत्या. यावेळी व्यासपीठावर सरपंच अशादेवी बिराजदार, संचालिका पवित्रा खेडगी, उप सरपंच आशा कवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, माजी सरपंच बसवराज तानवडे उप प्राचार्या वैदेही वैद्य, उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. गणपत कलशेट्टी यांनी प्रस्तविकातून शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेत अहवालवाचन केले. यावेळी पुढे बोलताना डॉ. कलशेट्टी म्हणाले, ग्रामीण भागात शहराप्रमाणे अनेक सुविधा येत आहेत. पण स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामस्थांमध्ये अनास्था आहे. ती दूर होण्यासाठी एन. एस. एस.शिबिरातून कृतीयुक्त जनजागृती होण्याची शासनाची अपेक्षा आहे. या शिबिरातून समाधानकारक कार्य झाल्याची माहिती ग्रामस्थांतून व्यक्त झाल्यामुळे आनंद वाटल्याचे सांगितले..
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांनी शिबिरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन यापुढेही यापेक्षा उत्तम कार्य करण्याचे अभिवचन दिले. आनंद तानवडे यांनी विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शिरवळ येथील माजी सैनिक आणि बारा बलुतेदारांचा सन्मान करण्यात आला. शिबिरात उत्तम कामगिरी केलेल्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या हमीदा पठाण, रुपाली गायकवाड, मंगल थोरात, निर्मला तानवडे, सत्यभामा कोरे, मनीषा दूधभाते, कांताबाई निंबाळे, शैलजा माने-पाटील, मनीषा जोगदंनकर,
पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, कार्यक्रमधिकारी डॉ. चौडप्पा आणेकर, कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधीकारी प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. सिद्धाराम पाटील, डॉ. विठ्ठल वाघमारे, डॉ. लता हिंडोळे, प्रा. दीपिका दिवटे, सिद्धलिंग भैरूनगी, प्रा. स्नेहा हेबळे, प्रा. नागेश विजापूरे, ग्रामविकास अधिकारी अभय निलोरे, सूरज सोनके, वसंत माने पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर डॉ. चौडाप्पा आणेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button