आई-वडिलांचे स्वप्न साकार करायच असेल तर विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया पासून दूर राहावे : पोलीस निरीक्षक दीपक भिताडे
कै. वसंत अंबाजी भांगे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धार्थ सोशल फौंडेशन वतीने शालेय साहित्य वाटप
अक्कलकोट : प्रतिनिधी
*आई-वडिलांचे स्वप्न साकार करायच असेल तर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या इन्स्टा फेसबुक आणि व्हाट्सअप पासून दूर राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी विद्यार्थ्यांना केले
कै. वसंत अंबाजी भांगे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धार्थ सोशल फौंडेशन वतीने वागदरीच्या श्री एस.एस. शेळके प्रशालेत येथे शंभर मुलांना शालेय साहित्य बॅग आणि इतर शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगात अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी बोलताना म्हणाले की, आजच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागत नाही आमच्या काळात आम्ही दोन दोन किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घेत असे दोन दोन चार चार तास अभ्यास केल्यामुळे आज मी आपल्या समोर अधिकारी म्हणून उभे आहे आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणे गरजेचे आहेत
आजचे नर्सरी पासून ते कॉलेज तरुण-तरुणी विद्यार्थी मोबाईल आणि इतर सोशल माध्यमाला कनेक्ट झाले आहेत या विद्यार्थ्यांना या सोशल माध्यमाचा फायद्या पेक्षा वाईट गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमाच्या व्हाट्सअप फेसबुक इन्स्टा या असे इतर माध्यमातून दूर राहून आपल्या करियर आणि अभ्यासाकडे लक्ष देणे अधिकचे गरजेचे आहे असं भिताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितल.. चंद्रशेखर भांगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून आज लोकशाही न्यूज चॅनलच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत ही गोष्ट छोटी नाही खरंतर चंद्रशेखर भांगे यांच्या बातम्या मी नागपूर ग्रामीण पासून बघत आहे आता त्यांच्याच तालुक्यात मला काम करायची संधी मिळाली आहे याचा मला अभिमान आहे..
प्रस्तावना करताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की दर वर्षी वसंत भांगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गरीब वंचित घटकातील मुलांना विविध शालेय साहित्य वाटप करण्याचे काम सिद्धार्थ सोशल फौंडेशनच्या माध्यमातून चंद्रशेखर भांगे हे करत असताना माणूस कितीही मोठा झालं तरी आपल्या मातीशी असलेले नाळ कसे जपलं पाहिजे हे भांगे यांनी आदर्श घालून दिले आहे वंचित घटकातील मुलं शिक्षणपासून वंचित राहू नये यासाठी छोटासा प्रयत्न भांगे यांनी केले आहे
यावेळी मान्यवाराच्या हस्ते श्री ची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले शाळेतील मुलीने स्वागत गीत म्हणत सर्वांचे स्वागत केले
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि लोकशाहीची चंद्रशेखर भांगे श्री एस एस शेळके चेअरमन बसवराज शेळके, सिद्धार्थ सोशल फौंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, प्राचार्य अनिल देखमुख, गोगांवचे माजी सरपंच प्रदीप जगताप, वागदरीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण सलगरे, हवालदार अंगद गिते, लक्ष्मण कांबळे,टेगळे,उद्योगपती बसवराज सोनकांबळे. महादेव सोनकवडे, नितीन हलसंगी, असलम मुल्ला, यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन जयश्री शेळके मॅडम यांनी केले आभार मठपती सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कुलकर्णी सर पुजारी सर घुगरे सर,यासह शिक्षक स्टाप परिश्रम घेतले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!