वटवृक्ष मंदिर समितीच्या सन्मानाने भारावून गेलो – न्यायमूर्ती अरुण पेडणेकर
न्यायमूर्ती अरुण पेडणेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करतानाचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.

वटवृक्ष मंदिर समितीच्या सन्मानाने भारावून गेलो – न्यायमूर्ती अरुण पेडणेकर
HTML img Tag

(श्रीशैल गवंडी,)
येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने स्वामींच्या निस्सिम भक्तांना जीवन जगण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतूनच आमच्या सारख्या भाविकांच्या स्वामींवरील श्रध्देत वृद्धी होत असते असे मनोगत
मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वामींच्या दर्शनाकरीता येथे आले असता बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी
न्यायमूर्ती अरुण पेडणेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना
न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी स्वामींचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहुन मंदीर समितीच्या माध्यमातून महेश इंगळे यांनी भाविकांना आपल्या स्वामी सेवेच्या माध्यमातून दृढ भक्तीचा आनंद देत त्यांचेही भविष्यकालीन जीवन असेच आनंदित जीवन व्यतीत होत रहावे या करीता स्वामींच्या चरणी साकडे घातले असून मंदिर समितीच्या सन्मानाने व आदरतिथ्याने आपण भारावून गेलो असल्याचे मनोगतही
न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी अक्कलकोटचे न्यायाधीश एम.एम. कल्याणकर, एन.ए.एल.शेख, स्वप्निल मोरे, धनंजय कलमदाने, प्रा.शिवशरण अचलेर, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, इत्यादी उपस्थित होते.