अक्कलकोटात श्री शमीविघ्नेश गणेश मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजा व सत्कार
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, न्यासाच्या श्री शमीविघ्नेश गणेश मंदिरात सोमवार रोजी सायं. ७ वा. अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे आणि कनिष्ठ अभियंता अरुण कांबळे यांच्या हस्ते श्रींची पूजा संपन्न झाली.
यावेळी कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते कृषी अधिकारी मंगरुळे व अभियंता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपकृषी अधिकारी सतीशकुमार वाघमोडे, सहाय्यक कृषी अधिकारी सतीश संगोळगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेल्या सहा दिवसांपासून श्रींचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते होत असून, शमीवृक्षाखाली ३२ वर्षांपूर्वी श्री गणेशाची स्थापना करून उभारलेले हे मंदिर व सभामंडप भक्तांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर वसलेले हे मंदिर भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मुख्य पालखी संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, प्रा. शरणप्पा अचलेर, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले तसेच सेवेकरी, कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. रमाकांत डाके, मुख्याधिकारी, अक्कलकोट नगरपरिषद यांच्या हस्ते श्रींची पूजा आयोजित करण्यात आली आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!