श्री गणेशा आरोग्य अभियानातून 963 रुग्णांची तपासणी; 3 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ

श्री गणेशा आरोग्य अभियानातून 963 रुग्णांची तपासणी; 3 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
अक्कलकोट : लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने “श्री गणेशा आरोग्याचा” आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

जुना अडत बाजार येथे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या शिबिराचे उद्घाटन व महाप्रसादाचे वाटप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, “गणेशोत्सव हा केवळ उत्सवाचा नव्हे तर सामाजिक उपक्रमांचा माध्यम असावा.”

या शिबिरात तब्बल 963 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एक हृदय व एक यकृत रुग्ण पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले. तसेच 3 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ही माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व अध्यक्ष सिद्धाराम टाके यांनी दिली.

या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपा माजी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू, भाजपा मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, उदय नरेगल, निजाप्पा गायकवाड, धोंडाप्पा बनसोडे, रुद्रया स्वामी यांच्यासह लोकमान्य मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रुग्ण तपासणीत डॉ. अश्विन करजखेडे (तालुका वैद्यकीय अधिकारी), डॉ. कविता देशमुख, डॉ. मंजुनाथ पाटील, डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे, डॉ. ओंकार माशाळकर, डॉ. स्वप्निल हिप्परगी, डॉ. मयूर बिराजदार आदी डॉक्टरांनी सेवा बजावली. तर परिचारिका व स्वयंसेवक म्हणून अलका विभुते, सिद्धाराम नंदर्गी, अमोल टोणपे, ललिता बंदीछोडे, सुनिता राठोड, सुप्रिया पवार, रूपाली शिरसागर, शिवा कोटी, विजय विजापुरे, श्वेता जाधव, अंकिता गंगापुरे, अंजली परीट यांनी सहभाग घेतला.
👉 या उपक्रमामुळे गणेशोत्सवाचा सामाजिक भान अधिक अधोरेखित झाल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.