सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह २०२५
मा. सुभाष (बापू) देशमुख यांची वागदरी ग्रामपंचायतीला भेट

HTML img Tag
वागदरी (प्रतिनिधी) –
सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह २०२५ निमित्त आमदार तथा माजी मंत्री मा. सुभाष (बापू) देशमुख यांनी वागदरी ग्रामपंचायतीला भेट दिली. या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत गावातील पर्यटन व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सरपंच शिवानंद घोळसगाव, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल ठोंबरे, मुल्ला गुरुजी, शिवराज पोमाजी तसेच वागदरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनवाढीचा लाभ ग्रामीण भागांना मिळावा यासाठी गावांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. स्थानिक नैसर्गिक व सांस्कृतिक संपत्तीचा योग्य वापर करून रोजगारनिर्मिती व गावाच्या आर्थिक विकासास गती देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांनी या निमित्ताने गावातील पायाभूत सुविधांच्या संदर्भात आपल्या अपेक्षा मांडल्या. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन सरपंच शिवानंद घोळसगाव यांनी दिले.
वागदरी गावात पर्यटन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!